कामठी : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात काेराेना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यात येरखेडा (ता. कामठी) येथील ६० वर्षांवरील १५० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीने विशेष शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते, असे तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने यांनी सांगितले.
याप्रसंगी नागरिकांना काेराेना संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच लसीकरणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराला तहसीलदार अरविंद हिंगे, खंडविकास अधिकारी अंशुला गराटे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, सरपंच मंगला कारेमोरे, ग्रामविकास अधिकारी जितेंद्र डावरे, उपसरपंच शोभा कराडे, ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा बर्वे उपस्थित हाेते. ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी घराेघरी जाऊन काेराेना लसीकरणाबाबत जनजागृती करीत आहेत. इतर नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यशस्वितेसाठी अमोल घडले, गजानन तिरपुडे, सुमेध दुपारे, नरेश मोहबे, वनिता नाटकर, मंगला पाचे, जयश्री धीवले, राजकिरण बर्वे, जॉनी भस्मे यांनी सहकार्य केले.