शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

महिला व बाल विकास विभागात रिक्त पदांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST

नागपूर : ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग ...

नागपूर : ग्रामीण भागातील बालक, किशोरवयीन मुली व गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करतो. परंतु या विभागाची नियोजन आणि पर्यवेक्षिय यंत्रणेत रिक्त पदांचा मोठा बॅकलॉग आहे. त्याचा फटका योजनांच्या अंमलबजावणीला बसतो आहे.

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत सहा वर्षांखालील मुलांचे पोषण व आरोग्य सुधारणे व पूर्व प्राथमिक शिक्षण आदी सेवा देण्यात येतात. यासाठी महिला व बालविकास विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाची यंत्रणा काम करते. जिल्ह्यात जवळपास २४२३ अंगणवाडी केंद्रातून ६ वर्षे वयोगटातील बालक, गरोदर माता व स्तनदा माता यांना सेवा पुरविण्यात येतात. आजच्या परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातच दिवसेंदिवस कुपोषित बालकांतील चढ-उतार कायमच आहे.

अधिकाऱ्यांचा कार्यभार प्रकल्पातील काही पर्यवेक्षिकांवर आहे. पर्यवेक्षिकाकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील व इतर क्षेत्रातीलही अंगणवाड्यांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य असून प्रकल्प कार्यालयाचेही काम आल्याने त्यांना अंगणवाडीवर नियंत्रण ठेवता येत नाही. शासन मोठ-मोठी उद्दिष्ट ठेवून कार्य करते. परंतु रिक्त पदांमुळे त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही.

संवर्गनिहाय रिक्तपदे

संवर्ग मंजूर पदे रिक्त पदे

बाल विकास प्रकल्प अधिकारी १३ ७

पर्यवेक्षिका ८७ ३१

अंगणवाडी सेविका २१६१ ७३

अंगणवाडी मदतनीस २१६१ १२८

मिनी अंगणवाडी सेविका २६४ ९