शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

पदव्युत्तर वैद्यकीय संस्था सुरू करण्याला रिक्त पदांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

सुमेध वाघमारे नागपूर : मध्य भारतातील एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला २६ वर्षे झाली आहेत. परंतु रिक्त पदांचा खोडामुळे पदव्युत्तर ...

सुमेध वाघमारे

नागपूर : मध्य भारतातील एकमेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला २६ वर्षे झाली आहेत. परंतु रिक्त पदांचा खोडामुळे पदव्युत्तर वैद्यकीय संस्था निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशपासून अद्यापही दूर आहे. विशेषत: ‘युरोलॉजी’, ‘सीव्हीटीएस’ व ‘अ‍ॅनेस्थेसिया’ विभागात प्राध्यापकच नाही. पात्र सहयोगी प्राध्यापकांना बढती न दिल्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम रखडल्याचे वास्तव आहे. लोकप्रतिनिधीने यात पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्यास ‘सुपर’मध्ये पदव्युत्तर डॉक्टरांची संख्या वाढेल सोबतच, रात्री अपरात्री येणा-या रुग्णांना उपचारही मिळतील.

कोरोनाच्या संसर्गात डॉक्टरांची मोठी कमतरता भासत आहे. कोरोनाच्या लाटा येतच राहणार असल्याने या रुग्णांसोबत इतरही आजाराची गुंतागुंत घेऊन येणा-या पोस्ट कोविड रुग्णांची संख्या वाढणार आहे. परिणामी, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांवरील रुग्णांचा भार वाढणार आहे. यामुळे शासनाने आतापासून याची तयारी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची रिक्त पदे भरण्यासाठी मंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिले होते. त्यावेळी सहायक प्राध्यापकांना तदर्थ सहयोगी प्राध्यापक करण्यात आले. परंतु पुढे ही प्रक्रिया राबविण्यातच आली नाही. परिणामी, याचा फटका पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वप्न बाळगून असलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांसोबत गरजू रुग्णांना बसत आहे.

-पात्र प्राध्यापकाअभावी ‘एमसीएच’ची तपासणी रखडली

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील ‘युरोलॉजी’ विभागात ‘एमसीएच’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी २०१९ मध्ये मेडिकल प्रशासनाने पुढाकार घेतला. डॉ. संजय कोलते यांना या विभागाचे प्राध्यापक दाखविण्यात आले. परंतु ते कंत्राटी असल्याने तर तदर्थ सहयोगी प्राध्यापक डॉ. धनंजय सेलुकर यांना प्राध्यापकाच्या पात्रतेसाठी तीन महिन्यांचा कालावधी कमी पडल्याने तपासणी रखडली. दरम्यान, डॉ. सेलूकर यांना आठ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचा बढतीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला. परंतु कोरोनामुळे तो थंड बस्त्यात पडला आहे. ‘सीव्हीटीएस’चे सहयोगी प्राध्यापक डॉ. सतीश दास व अ‍ॅनेस्थेशिया विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. वली हे प्राध्यापक पदासाठी पात्र ठरत असतानाही बढती न मिळाल्याने त्यांचा विभाग पदव्युत्तर अभ्यासक्रमापासून अद्यापही दूर आहेत.

-‘डीएमईआर’कडून प्रस्तावाचा पाठपुरावा करणार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावतीने शासकीय रुग्णालयाचे सल्लागार असलेले डॉ. विरल कामदार म्हणाले, ‘सुपर’ला पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेचा दर्जा मिळणे आवश्यक आहे. यासाठी विविध विषयात ‘डीएम’ व ‘एमसीएच’ हे सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू होणे विद्यार्थी व रुग्णसेवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. या संदर्भात मेडिकलकडून पाठविण्यात येणा-या प्रस्तावाचा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून (डीएमईआर) पाठपुरावा केला जाईल.