शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाकीत दोघांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:59 IST

नागपंचमीची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आलेल्या मित्रांपैकी दोघांना वाकीच्या कन्हान नदीत जलसमाधी मिळाली.

ठळक मुद्देकन्हान नदीतील घटना : एकाचा मृतदेह सापडला, दुसरा बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कखापा : नागपंचमीची सुटी ‘एन्जॉय’ करण्यासाठी आलेल्या मित्रांपैकी दोघांना वाकीच्या कन्हान नदीत जलसमाधी मिळाली. यापैकी एकाचा मृतदेह घटनेनंतर अवघ्या काही वेळातच सापडला. दुसºयाचा शोध घेणे दुसºया दिवशीही सुरूच होते. जलसमाधी मिळाल्याची ही घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळच्या सुमारास घडली. मृत दोघेही सावनेर येथील रहिवासी होते.रजत मुन्ना पन्नामे (१७, रा. पहलेपार, सावनेर) आणि राहुल विक्की मेंढुले (२१, रा. रेल्वे स्टेशन रोड, सावनेर) अशी मृतांची नावे आहेत. विशाल श्यामलाल पराडकर (१७), शुभम बैजुलाल नरेटे (२२), जितेंद्र बैजुलाल नरेटे (२३), राहुल विक्की मेंढुले (२१), रजत मुन्ना पन्नामे (१७) आणि प्रकाश जीवनलाल मेंढुले (२३) हे सहा मित्र नागपंचमीची सुटी असल्याने सावनेर येथून वाकी येथे दुपारी ३ वाजताच्या सुमारास आले. वाकी दरगाह येथे दर्शन घेतल्यानंतर ते कन्हान नदीकडे गेले. तेथे आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. त्यामुळे आधी दोघे आणि नंतर दोघे असे चार जण नदीत उतरले. मात्र पाण्याच्या धारेत रजत आणि राहुल हे दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. ही बाब इतरांच्या लक्षात येताच ते रजत - राहुलच्या दिशेने गेले. मात्र पाहता - पाहता ते दोघेही पाण्यात बुडाले. उर्वरित चौघांनीही त्या दोघांचा शोध घेतला.मात्र आढळून आले नाही. अखेर याबाबत खापा पोलिसांना सूचना देण्यात आली.खापा पोलीस घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. दरम्यान तीन तासांच्या प्रयत्नानंतर राहुलचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नागपूरच्या अग्निशमन दलासही पाचारण करण्यात आले होते. अंधार झाल्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास शोध मोहीम थांबविण्यात आली.घटनास्थळी तहसीलदार राजू रणवीर, ठाणेदार अनामिका मिर्झापुरे हे ताफ्यासह हजर होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. या प्रकरणी खापा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप वासाडे, सहायक उपनिरीक्षक मुकुंदा लोंदे करीत आहे.वेणा दुर्घटनेच्या स्मृती ताज्यावेणा जलाशयात गेल्या ९ जुलै रोजी अशाचप्रकारे एका दुर्घटनेत आठ तरुणांना जलसमाधी मिळाली. वाकी येथील घटनेनंतर पुन्हा त्या घटनेच्या स्मृती ताज्या झाल्या. पिकनिकसाठी गेलेल्या १० तरुणांपैकी आठ जणांना बोट उलटल्याने वेणा जलाशयात जलसमाधी मिळाली. त्यात नावाडी आणि दोन भाऊ असे तिघे बचावले. मृतांमध्ये राहुल जाधव, अंकित अरुण भोस्कर, परेश काटोके, रा. नागपूर, रोशन खांदारे, अक्षय मोहन खांदारे, अतुल भोयर,पंकज डोईफोडे व प्रतीक आमड या आठ जणांचा समावेश होता. तर अमोल मुरलीधर दोडके , रोशन मुरलीधर दोडके व नावाडी अतुल ज्ञानेश्वर बावणे हे तिघे बचावले. वाकी येथेही अशाचप्रकारे सहा मित्र फिरायला गेले होते. ते नदीपात्रात जाताच त्यांना पाण्याच्या प्रवाहाने ओढत नेले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.