शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चौकशी अधिकाऱ्यावर दबावतंत्राचा वापर

By admin | Updated: May 12, 2017 02:58 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे.

एनडीसीसी बँक घोटाळा : मानसिक स्थिरतेवर केला जातो आघात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२४.६० कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी-विक्री घोटाळ्याची चौकशी करणे कठीण आव्हान झाले आहे. चौकशी अधिकाऱ्यावर सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे दबावतंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे चौकशी अधिकाऱ्याच्या मानसिक स्थिरतेवर आघात होतो. पूर्वीचे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे या कटू अनुभवातून गेले आहेत. बँकेचे माजी अध्यक्ष व सावनेरचे विद्यमान आमदार सुनील केदार आणि बँकेचे माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी हे याप्रकरणातील प्रमुख आरोपी आहेत. केदार यांच्यामुळे याप्रकरणाला राजकीय कोन आहे. दबावतंत्राचा वापर उघडपणे केला जात नसल्यामुळे चौकशी अधिकाऱ्याला कोण त्रास देतो याचा शोध घेणे स्वतंत्र तपासाचा विषय झाला आहे. सहकारी संस्थांच्या घोटाळेबाज पदाधिकाऱ्यांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम-१९६० अंतर्गत चौकशी केली जाते. सुरुवातीस या चौकशीला जास्त गांभीर्याने घेण्यात आले नव्हते. परंतु, प्रथम चौकशी अधिकारी यशवंत बागडे यांनी केदार यांच्यासह आठ जणांना घोटाळ्यासाठी जबाबदार धरले होते. तसेच, केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाख ३३ हजार, तर चौधरी यांच्यावर २५ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. त्यामुळे सर्व आरोपींचे धाबे दणाणले. आरोपींच्या अपीलानंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी तांत्रिक कारणाने अहवाल नामंजूर केल्यामुळे आरोपी बचावले. परंतु, त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. प्रकरणाची फेरचौकशी केली जात आहे. बागडे यांच्या अहवालानंतर अनेकांना फेरचौकशी पूर्ण होऊ नये असे वाटत आहे. त्यामुळेच दुसरे चौकशी अधिकारी अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांना विविध प्रकारे त्रास देण्यात आला होता. त्यांना दूरध्वनी करून धमक्या देण्यात येत होत्या. पैशांचा मोह दाखविला जात होता. एवढेच नाही तर, शासनही त्यांना योग्य सहकार्य करीत नव्हते. चौकशी करण्यासाठी आवश्यक सुविधा त्यांना दिल्या जात नव्हत्या. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष स्वत:ची व्यथा मांडली होती. यावरून चौकशी प्रभावित करण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचे स्पष्ट होते. खरबडे यांनी चौकशी सोडल्यानंतर शासनाने प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्याकडे प्रकरणाची कागदपत्रे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आता पुढील घडामोडींवर सर्वांची नजर आहे.