शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोच्या उभारणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

By admin | Updated: April 11, 2016 03:02 IST

नागपूर शहरात वाहतूक व्यवस्थेचे एक सुंदर जाळे मेट्रो रेल्वेमुळे निर्माण होत आहे. जगातील सर्वोत्तम मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोचा लौकिक वाढेल, ...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन : केएफडब्ल्यू-एनएमआरसीएल यांच्यात ३७५० कोटींचा प्रकल्प करारनागपूर : नागपूर शहरात वाहतूक व्यवस्थेचे एक सुंदर जाळे मेट्रो रेल्वेमुळे निर्माण होत आहे. जगातील सर्वोत्तम मेट्रो म्हणून नागपूर मेट्रोचा लौकिक वाढेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे रविवारी आयोजित नागपूर मेट्रो कामासाठी जर्मनीचा केएफडब्ल्यू बँकेसोबत प्रकल्प करार करण्यात आला त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते.या समारंभात प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विशेष उपस्थितांमध्ये महापौर प्रवीण दटके, लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, समीर मेघे यांच्यासह विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, केएफडब्ल्यू बँकेचे संचालक (भारत) पीटर हिलिगेस, वरिष्ठ सेक्टर तज्ज्ञ डॉ. उषा राव, नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, कार्यकारी संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) एस. रामनाथन, संचालक महेशकुमार (प्रोजेक्ट) आणि संचालक सतीश माथूर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून वाहतूक व्यवस्था नागपुरात प्रस्थापित करण्यात येत आहे. नागपूर मेट्रो ही सर्वसामान्यांना परवडेल अशातऱ्हेने विकसित होत आहे. त्यामुळे नागपुरात मोठे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. एकविसाव्या शतकाकडे नागपूरचा प्रवास होत आहे. मेट्रोचा मार्ग अजनी रेल्वेच्या जवळून मध्यवर्ती कारागृहाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्याने नेण्याबाबत निश्चितपणे विचार करण्यात येईल. त्यामुळे अजनी स्थानकावरील प्रवाशांना याचा फायदा होईल. यासंदर्भात कारागृह महासंचालकांसोबत याच आठवड्यात चर्चा करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. महापौरांच्या लंडन स्ट्रीटला मेट्रोशी जोडण्याच्या प्रस्तावावर त्यांनी होकार दिला. लंडन स्ट्रीटवरून जमिनीवरून मेट्रो धावू शकते, त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नामांकित रचनाकार कंपन्याच्या प्रतिनिधींनी नागपूर मेट्रोची रचना व मार्ग यासंबंधीचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर ‘एनएमआरसीएल’चे संचालक महेश कुमार यांनी आभार मानले.(प्रतिनिधी) १५ वर्षांनंतर ‘केएफडब्ल्यू’ची आर्थिक मदतमुख्यमंत्र्यांनी केएफडब्ल्यू बँकेच्या आशिया देशाच्या अध्यक्षांसोबत १९९९ मध्ये झालेल्या चर्चेची आठवण यावेळी केली. ते म्हणाले, नागपुरात एकात्मिक वाहतूक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी १९९९ ला केएफडब्ल्यू बँकेच्या कार्यालयात मी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या आशिया देशाच्या अध्यक्षांसोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी शहरातील बस व्यवस्था अधिक सक्षम केल्यावर मेट्रोचा विचार करता येईल, असे सांगितले होते. आज १५ वर्षांनंतर नागपूर मेट्रोला ही बँक वित्तीय साहाय्य करत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मेट्रो रेल्वेसाठी शुभ संकेत : दीक्षितबृजेश दीक्षित यांनी सांगितले की, दिल्लीत वित्तीय वर्षाच्या पहिल्या दिवशी १ एप्रिलला ५०० दशलक्ष युरो (३७५० कोटी) कर्जाचा करार झाला. आता गुढीपाडव्याच्या दोन दिवसानंतर प्रकल्प करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हे मेट्रो रेल्वेसाठी शुभ संकेत आहेत. दहा महिन्यात मेट्रो प्रकल्पाचे १० टक्के काम झाले आहे. पुढील काम आव्हानात्मक आहे. त्यावर मात करून कामाला गती देण्यात येईल. मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण राहील. स्थानके विश्वस्तरीय राहील. वयस्क आणि दिव्यांगांच्या सुविधेवर विशेष लक्ष दिले जाईल. मेट्रो रेल्वे आंतरराष्ट्रीय दर्जाची होणार : नितीन गडकरीनितिन गडकरी यांनी सांगितले की, ६५ टक्के सोलर एनर्जीवर चालणारी मेट्रो रेल्वे गुणवत्तापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय व्हावी. जगातील सर्वोत्तम मेट्रो बनविण्यासाठी गुणवत्तेत सुधारणा आणि गुंतवणूक कमी करण्यावर भर द्यावा. नागपूर मेट्रोच्या बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीसाठी शासनाने रेतीघाट दिल्यास बराच खर्च वाचू शकेल. मेट्रोसाठी प्री-कॉस्ट फॅक्टरी निर्माण झाल्यास मेट्रोचा खर्च १,५०० कोटी रुपयांपर्यत कमी होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. एनएचएआय वर्धा रोडवर पूल बांधणार आहे. नागपूर विमानतळाजवळील पुलावरून रेल्वे नेण्याचा निर्णय घेतला आहे. कामठी रोडवर असेच करण्यात येईल. मेट्रोचे आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्किटेकसाठी स्पर्धा घेण्यात येऊन मेट्रोचे डिझाईन निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मेट्रो रेल्वे काँग्रसनगर येथून रहाटे कॉलनीकडे जाईल. येथे अजनी स्टेशन काही अंतरावर आहे. अशा स्थितीत जनसुविधा आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अजनी स्थानक ते वर्धा रोडमध्ये डीपी प्रकल्पांर्गत मेट्रो चालविण्यावर भर द्यावा. मेट्रो रेल्वेमुळे सीताबर्डी ते डिफेन्स आणि हिंगणा मार्गावर बससेवा विकसित होईल. मेट्रोचा विकास डिफेन्स, हिंगणा, कन्हानपर्यंत करण्याच्या प्रस्तावावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले. वर्धा रोडवरून लंडन स्ट्रिट मार्गाने मेट्रो नेल्यास रेस्टॉरंट व मॉल्स मोठ्या प्रमाणात उभे राहू शकतात. यासाठी मनपाने लंडन स्ट्रीटवरील जमीन मोफत देणे गरजेचे असल्याचे गडकरी म्हणाले. इको सिस्टीमकरिता कर्ज देणार: हिलिगेसकेएफडब्ल्यूचे (इंडिया) संचालक पीटर हिलिगेस यांनी सांगितले, मेट्रो प्रकल्पाव्यतिरिक्त नागपुरात सर्वोत्तम इको-सिस्टीम विकसित करण्यासाठी केएफडब्ल्यू कर्ज देईल. नागपूर, महाराष्ट्र, दिल्ली आणि जर्मनीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. पहिल्यांदा केएफडब्ल्यूने मेट्रो प्रकल्पाला कर्ज दिले आहे. दिल्ली येथील करारानंतर आज प्रकल्प करार झाला. यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय नागरी विकास मंत्रालयातर्फे भरपूर सहकार्य मिळाले. मेट्रोच्या प्रगतीवर त्यांनी समाधान व्यक्त करताना हिलिगेस मेट्रो रेल्वे सर्वोत्तम ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. साऊंड सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड‘एनएमआरसीएल’तर्फे हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये आयोजित प्रकल्प करार समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. पण हॉटेलच्या हॉलमधील साऊंड सिस्टीमचा कर्कश आवाज उपस्थितांना खटकला. हॉलमध्ये बसलेल्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला. मंचावरून अतिथींनी दिलेले भाषण स्पष्टपणे ऐकू आले नाही.