शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेची मतदार यादी जि.प.च्या निवडणुकीत वापरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:14 IST

बुधवारी आयोगाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत; सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.

ठळक मुद्देराज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम केला जाहीर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य निवडणूक आयोगाने प्रलंबित असलेल्या पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. बुधवारी आयोगाने पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढून विधानसभेसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत; सोबतच मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.राज्य निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पत्र काढले होते. त्यात स्पष्ट केले होते की, जिल्हा परिषद व पं.स. च्या निवडणुका विहित कालावधीत घेण्याकरिता ४ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादी तयार करण्यात आली. त्यानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत गणनिहाय विभाजन करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. पत्रात असेही स्पष्ट केले की, सर्वोच्च न्यायालायने राज्य सरकारला दोन महिन्याच्या कालावधीत आरक्षणासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. परंतु राज्य सरकारने ते पूर्ण केले नाही. त्यामुळे १९ जुलै २०१९ रोजी आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण वाटपाच्या आधारे कार्यक्रम तत्काळ जाहीर करण्याचेही सर्वोच्च न्यायालयाने आदेशित केले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी आयोगाने निवडणुकीसाठी विधानसभेची मतदार यादी वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी कार्यक्रमही जाहीर केला आहे. आयोगाने जाहीर केलेला मतदार यादीचा कार्यक्रम

  • प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करणे
  • प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना ६ नोव्हेंबरपर्यंत दाखल कराव्यात.
  • प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून ८ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध कराव्यात.
  • मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ११ नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करावी.
टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक