शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशकांचा वापर वाढला!

By admin | Updated: July 26, 2014 20:56 IST

पाच वर्षांमध्ये सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा भरमसाट वापर वाढला

अकोला : अलिकडच्या पाच वर्षांमध्ये सोयाबीन व इतर पिकांवर तणनाशकांचा भरमसाट वापर वाढला असून, या तणनाशकांचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने केला जात नसल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी तर पीक उगवलेच नसल्याचे प्रकार घडले असल्याने तणनाशकांचा वापर करताना शेतकर्‍यांना काळजी घ्यावी लागणार आहे. विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र २0 लाख हेक्टरने वाढले आहे. या पिकाच्या मशागतीचा खर्च कमी आणि उत्पादन बर्‍यापैकी होत असल्याने शेतकर्‍यांचा कल सोयाबीनकडे जास्त आहे. या पिकातील तणाचा नायनाट करण्यासाठी तणनाशकांचा वापर अलिकडच्या पाच वर्षांमध्ये वाढला आहे; परंतु तणनाशकांचा वापर तंत्रशुद्ध पद्धतीने होत नसल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. यापृष्ठभूमिवर तणनाशकाच्या वापराबाबत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काही शिफारशी केल्या आहेत. या शिफारशीनुसार ढगाळ किंवा पावसाचे वातावरण असेल तसेच धुके किंवा पाऊस सुरू असेल तर तणनाशकांची फवारणी करणे योग्य नाही; तथापि नेमके याच काळात तणनाशकांचा वापर होत असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी पेरणीच्या किंवा दुसर्‍या दिवशी बियाणे मातीने व्यवस्थित झाकण्याची गरज आहे. यासाठी उगवण तणनाशके फवारताना तणांची उगवण झालेली नसणे पाहणे आवश्यक आहे. तणनाशक फवारताना ते अधूनमधून ढवळावे लागते. फवारणीसाठी फ्लॅट फैन किं वा फ्लड जेट नोझल वापरावे लागते. ठरावीक क्षेत्रात किती द्रावण फवारले, हे तपासणे गरजेचे आहे. २,४ - डी या तणनाशकांची मूग, उडीद या सारखे द्विदलवर्गीय पीक असल्यास फवारणी करू नये. तणनाशके पॉवर स्प्रेने फवारणी टाळावी, स्वच्छ पाणी वापरावे, इतर पिकांवर तणनाशकांचा फवारा पडणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कीटकनाशके, बुरशीनाशक ांशी संपर्क येणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. पूर्वानुभव नसल्यास त्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. २,४ डी- तणनाशकांचा कपाशी पिकावर दुष्परिणाम झाल्यास तो परिणाम कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. नवीन फूट येण्यासाठी त्यामध्ये एक किलो युरिया १00 लीटर पाण्यात फवारणी करणे आवश्यक आहे.