शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोळशापासून बनेल युरिया

By admin | Updated: September 12, 2016 02:49 IST

भारतात कोळशापासून युरिया बनविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार वेगाने कामाला लागले आहे.

अमेरिकन कंपनीचा गुंतवणुकीसाठी पुढाकार : दोन महिन्यात कामाला सुरुवात आनंद शर्मा  नागपूरभारतात कोळशापासून युरिया बनविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकार वेगाने कामाला लागले आहे. अमेरिकेतील एका कंपनीने गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूरसह एका अन्य ठिकाणी कोळशापासून युरिया बनविण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री राहिलेले सध्याचे गृहराज्यमंत्री चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर यांनी सांगितले. ‘लोकमत’ शी चर्चा करताना अहीर म्हणाले की, केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री असताना कोळशापासून युरिया बनविणाऱ्या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चासुद्धा झाली होती. कोळशापासून युरिया बनविण्याच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाने सक्षम असलेल्या कंपनीला आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अमेरिकेतील एका नामांकित कंपनीने या प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी रुची दाखविली आहे. या कंपनीला हे काम देण्याचे ठरले आहे. अहीर म्हणाले की दोन ठिकाणी कोळशावर आधारीत युरिया प्लॅन्ट लावण्यात येतील. मुबलक प्रमाणात चंद्रपुर येथे कोळसा उपलब्ध असल्याने चंद्रपूरला प्राथमिकता देण्यात येईल. कोळसा देण्यास वेकोलि तयारनागपूर : दुसऱ्या प्रकल्पाची जागा अद्यापही निश्चित झालेली नाही. या प्रकल्पाची अंदाजे किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये राहील. ४०० ते ५०० एकर परिसरात हा प्रकल्प होईल. प्रकल्पाची उत्पादन क्षमता १.२ मिलियन म्हणजे १२ लाख टन राहणार आहे. त्यासाठी वेकोलि कडून १.५ मिलियन म्हणजे १५ लाख टन कोळसा विकत घेण्यात येईल. कोळशावर आधारित युरिया प्रकल्पाचे काम दोन महिन्यात सुरू होण्याचे संकेत त्यांनी दिले. यासंदर्भात वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन राजीव रंजन मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की कोळशावर आधारीत युरिया प्रकल्पासाठी वेकोलि नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून कोळसा देण्यास तयार आहे. कोल लिंकेजच्या माध्यमातून कोळसा दिल्या जाऊ शकतो. या मुद्यावर तत्कालीन केंद्रीय रसायन अणि उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासोबत दोन ते तीन वेळा चर्चा झाली आहे. त्यांनी कोळशावर आधारीत युरिया प्लॅन्टसाठी वेकोलि पुरेसा कोळसा देऊ शकते का,अशी विचारणा केली होती. (प्रतिनिधी)