शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्याच्या काही भागात गुरुवारी (दि. २८) रात्री विजांच्या कडकडाटांसह अर्धा तास अवकाळी व वादळी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्याच्या काही भागात गुरुवारी (दि. २८) रात्री विजांच्या कडकडाटांसह अर्धा तास अवकाळी व वादळी पाऊस बरसला. या पावसामुळे तालुक्यातील गहू व हरभरा या रब्बी पिकांना काहीअंशी फटका बसला आहे. दुसरीकडे, काेरडवाहू शेतातील रब्बी पिकांना या पावसाचा फायदा हाेणार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. ?

रामटेक तालुक्यात धानाचे पीक माेठ्या प्रमाणात घेतले जाते. धानाची कापणी केल्यानंतर काही शेतकरी बांध्यांमध्ये हरभऱ्याची तर काही गव्हाची पेरणी करतात. पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील २७ गावे साेडल्यास संपूर्ण तालुक्यात रब्बीची काेरडवाहू पिके घेतली जातात. चालू रब्बी हंगामात रामटेक तालुक्यामध्ये ९,२३२ हेक्टरमध्ये गव्हाची तर ६,५०० हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. ही दाेन्ही पिके बहुतांश काेरडवाहू भागात आहेत.

सध्या गव्हाचे पीक निसवायला सुरुवात झाली आहे. या काळात गव्हाच्या पिकाला पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने तसेच ओलिताचे साधन नसल्याने तसेच कालव्याने मिळत नसल्याने या पावसाचा गव्हाच्या पिकाला काही प्रमाणात फायदा झाला, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. पावसामुळे हरभऱ्याचा खार धुतल्या जात असल्याने चांगली फलधारणा हाेत नाही. त्यामुळे हरभऱ्याच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान हाेण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

या पावसामुळे रब्बी पिकांना १०० टक्के फायदा हाेणार नाही, अशी माहिती महादुला (ता. रामटेक) येथील शेतकरी धनराज झाडे यांनी दिली असून, गव्हाचे पीक निसवत असल्याने त्याला फायदा हाेणार असल्याचे तसेच हरभऱ्याच्या पिकाचे थाेडे नुकसान हाेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

...

सध्या थंडीने जाेर पकडला आहे. त्यामुळे गव्हाला जास्तीचे फुटवे फुटतील. त्यातून गव्हाच्या उत्पादनात थाेडी वाढ हाेईल. तालुक्यातील काही भागातील हरभऱ्याच्या पिकाला या पावसाचा फायदा हाेणार असून, काही भागातील हरभऱ्याच्या पिकाचे अंशत: नुकसान हाेऊ शकते.

- स्वप्निल माने,

तालुका कृषी अधिकारी, रामटेक.