शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

सूक्ष्म व लघु उद्योगांना आता ५ कोटींपर्यंत विनातारण कर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2023 21:19 IST

Nagpur News केंद्र सरकारने राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना भांडवल उभारणीसाठी विनातारण कर्ज मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटींपर्यंत नेली आहे.

नागपूर : केंद्र सरकारने राज्यातील सूक्ष्म व लघु उद्योगांना भांडवल उभारणीसाठी विनातारण कर्ज मर्यादा २ कोटी रुपयांवरून ५ कोटींपर्यंत नेली आहे. तसेच हमी शुल्कामध्येही सवलत दिली आहे. हा निर्णय १ एप्रिलपासून लागू झाला असून या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सूक्ष्म व  लघुउद्योगांचा फार मोठा फायदा होणार आहे. 

सूक्ष्म व लघु उद्योगांकडे भांडवल उभारणीसाठी बँकेकडून तारण मागितले जाते. याकरिता केंद्र सरकारने ‘क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मायक्रो अ‍ॅण्ड स्मॉल एंटरप्रायझेस’ (सीजीटीएमएसई) योजना सुरू केली होती. याअंतर्गत २ कोटींपर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. त्यावर व्याजदर सोडून अधिकची दोन टक्के गॅरंटी फी द्यावी लागत होती. गॅरंटी शुल्क कर्जदाराकडून न घेता बँकांकडून घेण्यासह विनातारण कर्ज मर्यांदा २ कोटींहून ५ कोटी करावी, अशी मागणी अनेक उद्योजक संघटनांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करून त्यांनी उद्योग क्षेत्राला दिलासा दिला आहे.

वार्षिक शुल्क कमी केल्याने दिलासा

यासह वार्षिक हमी शुल्कही कमी केले आहे. १० लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आधीच्या ०.७५ टक्क्यांच्या तुलनेत ०.३७ टक्के, १० ते ५० लाखांच्या कर्जासाठी १.१० टक्क्यांच्या तुलनेत ०.५५ टक्के, ५० ते १ कोटींच्या कर्जासाठी १.२ टक्क्यांच्या तुलनेत ०.६० टक्के, १ ते २ कोटींच्या कर्जासाठी आधीप्रमाणेच १.२ टक्के आणि २ ते ५ कोटींपर्यंत १.३ टक्के वार्षिक हमी शुल्क आकारण्यात येणार आहे. नव्या धोरणामुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांचा आर्थिक बोजा कमी झाला आहे. वार्षिक हमी शुल्क कमी झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे सूक्ष्म व लघू उद्योजकांना वाढीव आर्थिक साहाय्य मिळेल आणि भांडवल उभे करताना अडचण येणार नाही, तसेच लघू उद्योगाला चालना मिळेल.

उद्योगवाढीस अनुकूल वातावरण 

ही मागणी एमएसएमई मंत्रालयाकडे प्रलंबित होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या मागणीवर निर्णय घेऊन सूक्ष्म व लघू उद्योगांना दिलासा दिला आहे. सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका कर्जाची पूर्तता करतील. क्रेडिट गॅरंटी योजनेखाली ५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज देतील. या निर्णयामुळे उद्योग वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

सीए समीर बाकरे, आर्थिक विषयक अभ्यासक.

टॅग्स :businessव्यवसाय