शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थरारक घटनेनंतरही फुटाळा असुरक्षित

By admin | Updated: October 5, 2015 03:10 IST

निकीता फुलवानी या युवतीच्या जळीत प्रकरणानंतर ‘लोकमत’ने रविवारी फुटाळा तलावावर रात्री ८ ते ९.३० या काळातील चित्र अनुभवले.

पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष : शनिवारच्या घटनेचा विसरनागपूर : निकीता फुलवानी या युवतीच्या जळीत प्रकरणानंतर ‘लोकमत’ने रविवारी फुटाळा तलावावर रात्री ८ ते ९.३० या काळातील चित्र अनुभवले. यावेळी फुटाळा तलावावर नेहमीप्रमाणे युवक-युवती आणि नागरिकांची प्रचंड गर्दी अनुभवायला मिळाली. शनिवारची थरारक घटना घडल्यानंतरही परिसरात पोलिसांची गस्त असणे अपेक्षित असताना पोलिसांची गस्त नव्हती. याशिवाय प्रेमी युगुलांचे किळसवाणे प्रकारही खुलेआम सुरु असल्याचे दृष्टीस पडले. निकीतासारखी घटना घडु नये, यासाठी दक्षता म्हणून कुठलीच खबरदारी घेताना कुणीच आढळले नाही. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस आणि सुज्ञ नागरिकांचा दबावही परिसरात आढळून आला नाही. शनिवारी रात्री निकीता फुलवानी ही युवती गंभीररित्या जळाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे रविवारी फुटाळा तलावावर नेहमीसारखी गर्दी होणार नाही, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. ‘लोकमत’ने रविवारी रात्री ८ ते ९.३० या वेळात फुटाळा तलावावरील परिस्थिती अनुभवली. नेहमीप्रमाणे फुटाळा तलावावर नागरिकांची गर्दी झाली होती. काहीही घडलेच नाही, अशा अर्विभावात युवक - युवती नेहमीप्रमाणे फुटाळा परिसरात अश्लील चाळे करीत होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात असामाजिक तत्वांचा वावर असून येथे आपल्या मित्रांसह येणाऱ्या युवतींना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात छेडखानीच्या घटनाही घडतात पण प्रत्येकवेळी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले जाते. त्यामुळेच केवळ तक्रार आल्यावर कारवाई न करता पोलिस प्रशासनानेही अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पण एवढी गंभीर घटना घडूनही तलावावर एकही पोलीस गस्त घालताना किंवा तेथील अवैध प्रकारावर अंकुश लावताना दिसला नाही. रात्री उशीरापर्यंत तलावावर गर्दीचे चित्र दिसले. (प्रतिनिधी)किळसवाणे प्रकार सुरुचफुटाळा तलावावर प्रेमी युगुलांची दररोज गर्दी होते. अंधार पडला की या प्रेमी युगुलांचे किळसवाणे प्रकार सुरु होतात. फुटाळा तलावावर अनेक नागरिक कुटुंबासह येतात. लहान मुलांना हे किळसवाणे प्रकार पाहावे लागतात. अखेर सध्या तर कु टुंबासह फुटाळ्याला जाणे जवळजवळ बंदच झाले आहे. यामुळेच युवक - युवतींना फावते. यात प्रामुख्याने परप्रांतातील युवती येथे मोठ्या प्रमाणात येतात. निकीताच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस तेथे गस्त घालून हे प्रकार बंद करतील, अशी अपेक्षा होती. परंतु एकही पोलीस तेथे ड्युटीवर असल्याचे आढळले नाही.पोलीस चौकी बंदफुटाळा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गंभीर घटना घडल्यावर २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंत पोलिसांची गस्त नव्हतीच पण रविवारी फुटाळा परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे अचानक एखादी अप्रिय घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसच उपस्थित राहत नसल्यामुळे अडचण निर्माण होईल, यात शंका नाही.चिडीमारांचे टोळके सक्रियफुटाळा तलावावर येणाऱ्या प्रेमी युगुलांनी एकांतवास पाहून तलावाच्या काठावर बसल्यानंतर अनेकजण चिडीमारी करताना आढळले. या चिडीमारांपासून बचाव करण्यासाठी अनेक प्रेमी युगुल तेथून निघून गेल्याचे दिसले. कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे या चिडीमारांच्या टोळक्यांचे चांगलेच फावत असून त्यांच्यावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.