शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उपराजधानीत पोलिसांचा अभूतपूर्व बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 22:44 IST

गुरुवारी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे.

ठळक मुद्देरात्रंदिवस गस्त, ठिकठिकाणी आकस्मिक नाकेबंदी : गुन्हेगार, उपद्रवी समाजकंटकांवर नजर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी अभूतपूर्व बंदोबस्त लावला आहे. स्थानिक पोलीस आणि होमगार्डस्च्या मदतीला केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि मुंबई, नाशिक, सांगली तसेच धुळ्यावरूनही अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले आहे.देशाचे हृदयस्थळ असलेल्या नागपूर लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे निवडणूक लढत आहेत. त्यामुळे येथील लढतीवर देशाचे लक्ष लागलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे घडलेल्या स्ट्राँग रूम क्लिपिंग, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह विधाने आदी घडामोडींमुळे मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान गालबोट लागण्याची भीती लक्षात घेऊन पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. उपद्रवी मंडळी मुद्दामहून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेल्यास परिस्थिती कशी हाताळायची, यासंबंधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण (इलेक्शन ट्रेनिंग) देण्यात आले आहे. निवडणुकीचे मतदान भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहरातील ७,५०० पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मदतीला १५०० होमगार्डस् घेतले आहेत. सीआयएसएफची एक तर एसआरपीएफच्या दोन कंपन्याही बंदोबस्तासाठी बोलवून घेतल्या. सोबतच सांगलीच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातून २५० पोलीस, धुळ्याच्या प्रशिक्षण केंद्रातील ५० महिला पोलीस, मुंबई रेल्वेचे १०० जवान आणि नाशिक पोलीस अकादमीतून ६५ पोलीस अधिकारीही बोलवून घेण्यात आले आहे. नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी विविध भागात फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे. रात्रंदिवस पोलिसांची गस्त सुरू आहे. स्ट्राँग रूम, संवेदनशील वस्त्या आणि मतदान केंद्रांवर तसेच आजूबाजूला प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढच्या ३६ तासात रात्रंदिवस गस्त तसेच ठिकठिकाणी आकस्मिक नाकेबंदी केली जाणार आहे. शहरातील गुन्हेगारांना, नाहक वाद घालून उपद्रव करण्याची सवय असलेल्या समाजकंटकांवर नजर रोखण्यात आली आहे. 

७,५०० स्थानिक पोलीस, १५०० होमगार्डस्केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्यानाशिक, सांगली तसेच धुळ्यावरून अतिरिक्त पोलीस बळमुंबई रेल्वे पोलिसही मदतीला

रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी ,छापेमारी, सर्चिंग सुरूवाढलेली वर्दळ लक्षात घेत झोपडपट्टींमध्ये सर्चिंग, कोम्बिंग ऑपरेशन राबविले जात आहे. पाचपेक्षा जास्त जण रात्री ९ नंतर झोपडपट्टीत दिसल्यास त्यांना ताबडतोब ताब्यात घेण्यात येणार आहे. तपासणी करून त्यांचा तेथे जाण्याचा हेतू तपासण्यात येत आहे. अवैध दारूविक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019