शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

असंघटित कामगारांना मिळाला मदतीचा हात

By admin | Updated: November 19, 2014 01:59 IST

विदर्भातील ४0 कामगारांना शासनाची मदत, अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक १८ कामगारांचा समावेश.

अकोला : असंघटित कामगारांना अडचणीच्या वेळी शासनाकडून मदतीचा हात दिला जातो. ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील अशा ४0 कामगारांना सात लाख रुपयांची मदत शासनाने केली. यामध्ये सर्वाधिक लाभ अकोला जिल्ह्यातील १८ असंघटित कामगारांना मिळाला आहे. असंघटित, मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या कामगारांसाठी आर्थिक मदतीची तरतूद शासन करीत असते. या योजनेचा लाभ शेकडो कामगार घेतात. कामगार मंडळ, कामगार कल्याण मंडळ व कामगार आयुक्त या कार्यालयांच्या माध्यमातून लाभार्थी कामगारांची निवड केली जाते. कामगारांच्या दुर्धर आजारपणात, अपघात झाल्यास, पाल्यांच्या शिक्षणासाठी, कुटुंबात गरोदरपणामध्ये आणि मोठय़ा शस्त्रक्रियेसाठी मदत व्हावी, या भावनेतून शासन आर्थिक मदत करीत असते. अलीकडच्या काळात अनेक असंघटित कामगार शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. दर महिन्यात मदतीसाठी प्राप्त अर्जातून पात्र कामगारांची निवड केली जाते व त्यांना मदतीचा धनादेश दिला जातो. या योजनेतून ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील ४0 कामगारांना जवळपास सात लाख रुपये मदत स्वरूपात मिळाले. यामध्ये सर्वाधिक १८ कामगार एकट्या अकोला जिल्ह्यातील आहेत. अकोल्यातील कामगारांना तीन लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे. त्याखालोखाल वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येकी सात, नागपूरमधील चार, चंद्रपूरमधे दोन, तर अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एका मजुराला मदतीचा धनादेश प्राप्त झाला आहे. या जिल्ह्यांना जवळपास चार लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे.