कामठी : नान्हामांगली (ता. कामठी) येथील उपसरपंच पदासाठी शुक्रवारी (दि. १३) पाेटनिवडणूक घेण्यात आली. यात मंगेश अतकरे यांची उपसरपंचपदी बिनविराेध निवड करण्यात आली.
या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नाेव्हेंबर २०१८ मध्ये पार पडली हाेती. सात सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये गायत्री खंडाळे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली हाेती. त्यांनी तांत्रिक कारणामुळे २०२० मध्ये उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले. त्यामुळे या पदासाठी शुक्रवारी पाेटनिवडणूक घेण्यात आली. मंगेश अतकरे यांनी उपसरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविराेधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद अंतूरकर यांनी मंगेश अतकरे यांची उपसरपंचपदी बिनविराेध निवड झाल्याचे जाहीर केले. या विशेष सभेला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित हाेते.