शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विद्यापीठाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’ परिसर बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे आंदोलन; ‘कॅम्पस’चे प्रवेशद्वार बंद : कुलगुरूंना घ्यावी लागली धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ‘कॅम्पस’ परिसर बुधवारी सकाळी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दणाणून गेला. विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी चक्क ‘कॅम्पस’चे प्रवेशद्वार बंद करुन तेथेच अडीच तास ठिय्या दिला. वर्गांसाठी आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांनादेखील प्रवेश रोखण्यात आला. अखेर कुलगुरू, प्र-कुलगुरू व कुलसचिवांना धाव घ्यावी लागली व विद्यार्थ्यांशी चर्चा झाल्यानंतरच हा तणाव दूर झाला. या आंदोलनामुळे बुधवारी अनेक विभागांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी दिसून आली.नागपूर विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मधील विविध पदव्युत्तर विभागांमध्ये पाण्याची सुविधा, स्वच्छता यांचा अभाव आहे. शिवाय विद्यार्थिनींच्या ‘कॉमन रुम’ची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थिनींच्या वसतिगृहापासून थेट बस नसल्यामुळेदेखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.या समस्या वारंवार प्रशासनासमोर मांडल्यावरदेखील काहीच पावले उचलण्यात येत नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सकाळी १० च्या सुमारास विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडले आणि प्रशासनाविरोधात निदर्शने सुरू केली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांना पाचारण करण्यात आले. शिवाय कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पुरण मेश्राम हेदेखील ‘कॅम्पस’ला पोहोचले. अधिकाºयांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून काही मागण्या तात्काळ मान्य केल्या व अखेर प्रवेशद्वार मोकळे झाले.मान्य झालेल्या मागण्यादेखील मांडल्याविद्यार्थ्यांनी अधिकाºयांसमोर आपल्या मागण्या मांडल्या. विद्यापीठाचे मुलींचे वसतिगृह ते ‘कॅम्पस’ या मार्गावर बससेवा सुरू करण्यासाठी मनपाने नकार दिला असला तरी विद्यापीठ पुढाकार घेईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले. शिवाय तिन्ही भाषांत अध्यापनासंदर्भात विभागप्रमुखांना सूचित करण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि सूचनांसाठी प्रत्येक विभागात तक्रारपेटी लावण्याची मागणीही कुलगुरूंनी मान्य केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्ये २४ तास वाचनालय सुविधा आणि ग्रंथालयात मुक्त प्रवेश यांचादेखील समावेश होता. मात्र या मागण्या अगोदरच पूर्ण झाल्या असून यांचा उल्लेख येथे का केला या शब्दांत कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना फटकारले.या समस्यांसाठी आंदोलनपिण्याच्या पाण्याची सुविधा नाहीअस्वच्छ प्रसाधनगृहेवॉटर कूलरची अनियमित सफाईविद्यार्थिनी वसतिगृहापर्यंत थेट बससेवा नाहीतिन्ही भाषांत अध्यापनाचा अभाव