शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ; अर्धे सत्र संपले, कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:08 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही.

ठळक मुद्देआता शिकवणार कधी ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ९२ पदांवर ही भरती होणार असून यासंदर्भात विरोध असतानादेखील प्रशासन ठाम आहे. मात्र अद्यापही पदभरतीच्या मुलाखतीला मुहूर्त लागलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही वेळापत्रक तयार झालेले नाही. अशा स्थितीत अर्धे सत्र संपले असताना आता भरती होणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठातर्फे विविध पदव्युत्तर विभागांमध्ये कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी ३० जुलै रोजी जाहिरातदेखील देण्यात आली. पदभरतीसाठी नियमित पदांप्रमाणेच शैक्षणिक पात्रता मागण्यात आली आहे. संबंधित जाहिरातीनुसार कंत्राटी प्राध्यापकांना प्रति महिना २४ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासंदर्भात ‘नुटा’ने आक्षेपदेखील उपस्थित केले.मात्र महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठाच्या अधिनियमातील तरतुदींनुसारच ही पदभरती होत असल्याचे दावा प्रशासनातर्फे करण्यात आला. सद्यस्थितीत विद्यापीठात नियमित प्राध्यापकांच्या ३३४ पैकी १८५ जागा रिक्त आहेत. अशा स्थितीत कंत्राटी प्राध्यापकांची भरती करणे आवश्यक आहे. ही भरती नियमानुसार असून ती होईलच, असे कुलगुरूंनीदेखील स्पष्ट केले होते. साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत मुलाखतींची प्रक्रिया आटोपणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले होते. परंतु १२ सप्टेंबर उजाडूनदेखील मुलाखतींचा मुहूर्त अद्यापही उजाडलेला नाही. या पदभरतीसाठी ७०० हून अधिक उमेदवारांचे अर्ज आले होते व त्यांच्याकडून आता याबाबत विचारणा होत आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

आॅक्टोबर महिना उजाडणार ?विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना आॅक्टोबर महिन्यात सुुरुवात होणार आहे तर नोव्हेंबरमध्ये बहुतेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नियमित सत्र परीक्षा सुरू होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आॅक्टोबर महिन्यातच पदभरतीसाठी मुलाखती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदभरती झाली तर कंत्राटी प्राध्यापकांना पहिल्या सत्रात शिकविण्याची फारशी संधी मिळणारच नाही.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ