शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

नागपूर विद्यापीठ; संशोधनाद्वारे ‘डी.लिट.’, ‘डीएसस्सी’ची नाकेबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 10:14 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे.

ठळक मुद्देविद्यापीठ लवकरच निर्णय घेणारकेवळ मानद उपाधीच देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘पीएचडी’च्या बजबजपुरीवर नियंत्रण आणले. आता सार्वजनिक विद्यापीठ कायद्याचा आधार घेत संशोधनाद्वारे मिळणाऱ्या ‘डी.लिट.’ व ‘डीएसस्सी’वरदेखील नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे केवळ मानद उपाधीच देण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठातर्फे लवकरच निर्णय जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे.राज्यातील इतर मोठ्या विद्यापीठांनी संशोधनाद्वारे मिळणारी ‘डी.लिट.’ तसेच ‘डीएसस्सी’ या पदव्या बंद केल्या आहेत. नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातदेखील दोनपेक्षा अधिक मानद उपाधी देऊ नये अशी तरतूद आहे. सद्यस्थिती या दोन्ही पदव्यांसाठी विद्यापीठाकडे २५ हून अधिक प्रस्ताव आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून हे प्रस्ताव आले आहेत.‘पीएचडी’ झालेले संशोधक हे त्याच विषयामध्ये आणखी काही विशेष संशोधन करून या पदव्यांसाठी पदवीसाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवितात.नवीन विद्यापीठ कायद्यानुसार संशोधनाद्वारे ‘डी.लिट’ आणि ‘डी.एसस्सी’ या पदव्या देण्यासंदर्भात कुठलीही तरतूद केलेली नाही. त्यानुसार त्याची तपासणी करून या पदव्या देण्यात येतात. मात्र विद्यापीठ कायद्यानेच याला बंधने घातल्याने नागपूर विद्यापीठ लवकरच त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे यापुढे केवळ विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींनाच मानद उपाधी प्रदान करण्यात येईल, असा विद्यापीठ विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ