शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘शोधगंगा’ ज्ञानप्रवाहातून नागपूर विद्यापीठ ‘गायब’

By admin | Updated: March 5, 2017 01:47 IST

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ?

सामंजस्य करारासाठी पुढाकारच नाही विद्यापीठातील संशोधकांवर अन्याय कसे पोहोचणार राष्ट्रीय पातळीवर संशोधन ? योगेश पांडे   नागपूर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ‘शोधगंगा’ या प्रकल्पामुळे देशभरातील विद्यापीठांमधील संशोधकांना नवी दिशा मिळाली. परंतु तंत्रज्ञान व संशोधनाचे मोठमोठे दावे करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन मात्र या अनोख्या ज्ञानसागराबाबत उदासीनच आहे. नियमांनुसार प्रत्येक विद्यापीठाला ‘पीएचडी’ प्रबंध येथे ‘अपलोड’ करणे अनिवार्य आहे. इतर विद्यापीठांचे शेकडो शोधप्रबंध संकेतस्थळावर उपलब्ध असताना नागपूर विद्यापीठाचा आकडा अवघा एक इतका आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्यापही विद्यापीठाने यासंदर्भात सामंजस्य करार केला नसून आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन होत असल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील चांगले संशोधन देशपातळीवर पोहोचण्यास अडचणी येत असून एकाप्रकारे हा संशोधकांवर अन्यायच आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने २००९ मध्ये एम.फिल व पीएच.डी.साठी नवीन नियमावली लागू केली. भारतातील सर्व विद्यापीठांतील संशोधकांचे अंतिम संशोधन अहवाल एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत, या माध्यमातून नवीन संशोधकांना संशोधनातील एकसारखेपणा टाळता यावा व त्यांना प्रबंधांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘शोधगंगा’ व ‘शोधगंगोत्री’ हे प्रकल्प सुरू केले. ‘इन्फ्लिबनेट’ केंद्राच्या माध्यमातून हे प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत असून यांच्यामुळे संशोधकांसाठी माहितीचे खूप महत्त्वाचे संदर्भस्रोत खुले झाले आहेत व एका ‘क्लिक’वर देशातील कुठलाही महत्त्वाचा प्रबंध पाहणे शक्य झाले आहे. देशभरातील शेकडो विद्यापीठांनी यासंदर्भात सामंजस्य करार केलेले असून तेथील संशोधकांचे हजारो प्रबंध आजच्या घडीला सहजपणे उपलब्ध आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने ५ मे २०१६ रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार ‘पीएचडी’ प्रबंधांचे यशस्वी मूल्यांकन झाल्यानंतर तत्काळ त्याला ‘इन्फ्लिबनेट’च्या माध्यमातून ‘शोधगंगा’ संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे आवश्यक आहे. संशोधनाच्या या ज्ञानसागरापासून नागपूर विद्यापीठ अद्याप दूरच आहे. हा प्रकल्प सुरू होऊन अनेक वर्षे झाली असली तरी नागपूर विद्यापीठाने अद्यापही सामंजस्य करार केलेला नाही. यासाठी प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक पुढाकारदेखील घेण्यात येत नसल्याने संशोधकांची कुचंबणा होत आहे.