शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ नियमबाह्य खरेदी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 10:24 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

ठळक मुद्देकुलगुरूंच्या मंजुरीविना झाली खरेदी

आशिष दुबे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विभागाने नियमांचे पालन न करता कुलपती व इतर समितीची आवश्यक परवानगी न घेता सामानाची खरेदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात विभागाच्या संचालक डॉ.कल्पना जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.विविध आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यापीठाची महिला व पुरुष चमू रवाना झाली आहे. पथकातील सदस्यांसाठी ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी करण्यात आली. मात्र यासाठी कुलगुरू किंवा समितीची परवानगी घेण्यात आली नाही. विभागाने लाखोंची खरेदी केली आहे. विभाग संचालक डॉ.कल्पना जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण साहित्य ५ लाख १० हजार रुपयांचे होते. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ पथकातील सदस्यांच्या ‘ब्लेझर’ची किंमतच ५ लाख १० हजार रुपये पडली. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा खुलासा काही दिवसांअगोदर झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीत झाला. या मुद्याला गंभीरतेने घेत समितीने खरेदीला मंजुरी देण्यास नकार दिला. तसेच विभाग संचालकांकडून स्पष्टीकरण मागितले. डॉ.जाधव यांचे स्पष्टीकरण आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. वित्त व लेखा अधिकारी कार्यालयाला या व्यवहारांची माहिती कशी कळली नाही, हा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. या प्रकरणावर कुणीही बोलण्यास तयार नाही. वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांना संपर्क केला असता त्यांनीदेखील माहिती देण्यास नकार दिला. पुढील बैठकीत स्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. तर विभाग संचालक डॉ.कल्पना जाधव यांनी खरेदीत कुठलीही गडबड झाली नसल्याचा दावा केला. बैठकीत मंजुरीसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे समितीने दस्तावेज मागितले आहेत, असे त्यांचे म्हणणे मांडले. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी यासंदर्भात संपर्क होऊ शकला नाही.असे आहेत नियमसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विभागांना तीन लाखांपर्यंतची खरेदी करण्याचा अधिकार असतो. याहून अधिक रकमेची खरेदी करण्याच्या अगोदर निविदा प्रक्रिया राबवावी लागले. निविदा बोलविल्यानंतर सामान खरेदीवर कुलगुरूंची परवानगी घेणेदेखील अनिवार्य असते. मात्र शारीरिक शिक्षण विभागाद्वारे असे काहीच करण्यात आले नाही. मंजुरी न घेताच एका व्यक्तीला कंत्राट देण्यात आले. सामान विभागाला पोहोचविण्यातदेखील आले. देयकाला मंजुरी देण्यासाठी समितीसमोर ठेवण्यात आले. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी यावर हरकत घेतली. त्यानंतर विभाग संचालकांकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ