शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ करणार उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

By admin | Updated: September 3, 2014 01:17 IST

शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात

नागपूर : शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता दीक्षांत सभागृहात शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती डॉ. अर्चना नेरकर यांनी दिली.उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. माणिक खापर्डे, धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. रत्नाकर भेलकर, एम.पी.देव स्मृती धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.एन.एल.खोब्रागडेयांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट संशोधक पुरस्कार विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण जाधव यांना देण्यात येणार आहे. तर सामाजिक कार्यात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणारा सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार शासकीय वसंतराव नाईक संस्थेचे डॉ. भाऊ दायदार यांना देण्यात येणार आहे. भंडारा येथील आर. एम. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. जुल्फी शेख यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप राहणार आहे.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर व अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू अनुपकुमार अध्यक्षस्थान भूषवतील. या कार्यक्रमाला सर्व संलग्नीत महाविद्यालये व शैक्षणिक विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी चार अर्जविद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांसाठी पात्र शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यंदा विद्यापीठाला एकूण ३९ अर्ज प्राप्त झाले. मागील वर्षी हीच संख्या २५ इतकी होती. यातील बहुतांश अर्ज हे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी होते. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर विज्ञान व अभियांत्रिकी महाविद्यालये असतानादेखील उत्कृष्ट संशोधक पुरस्कारासाठी केवळ चार अर्ज आले.