शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

विद्यापीठांमध्ये पारदर्शकता हवी : बनवारीलाल पुरोहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 21:23 IST

देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारंभ संपन्न

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : देशाला विश्वगुरु करण्यासाठी प्रामाणिक विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार करणाऱ्या विद्यापीठांमध्ये यासाठी अगोदर पारदर्शकता येणे आवश्यक आहे. कुठल्याही दबाव, भीती शिवाय प्रामाणिकपणे कार्य झाले पाहिजे, असे मत तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात शनिवारी पार पडलेल्या या सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा नेत्रहीन विद्यार्थी राहुल बजाज याला ‘एलएलबी’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. नागपूर विद्यापीठात मी शिक्षण घेतले आहे व या विद्यापीठामुळेच मी घडलो. विद्यापीठाने मोठी प्रगती केली आहे. मात्र आणखी सुधारणांची आवश्यकता आहे. नागपूर विद्यापीठ देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ झाले पाहिजे, असे बनवारीलाल पुरोहित म्हणाले.देशाला संपन्न व समृद्ध करण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यार्थ्यांनी आपले राहणीमान साधे ठेवणे अपेक्षित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी प्रामाणिकपणाची कास धरली पाहिजे. प्रामाणिकपणाचा मार्ग कठीण असतो, मात्र तो शाश्वत असतो. यासाठी विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची प्रेरणा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, असा सल्लादेखील त्यांनी दिला.नागपूर विद्यापीठाने ‘डिजिटलायझेशन’मध्ये सर्व विद्यापीठांहून सरस काम केले असून आता पदवीदेखील ‘आॅनलाईन’ मिळणार आहे. नागपूर विद्यापीठ राज्यात सर्वात लवकर निकाल जाहीर करणारे विद्यापीठ आहे, अशी माहिती डॉ.काणे यांनी दिली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य व चार विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. प्रा.कोमल ठाकरे व वर्षा देशपांडे यांनी संचालन केले.नागपूर विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत सोहळ्यात पदकविजेत्यांमध्ये विद्यार्थिनींचेच वर्चस्व दिसून आले. दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल सुनील बजाज (एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रम) याला सर्वाधिक २० पदके-पारितोषिके प्रदान करण्यात आली तर ‘सेंट्रल इंडिया कॉलेज आॅफ लॉ’चा विद्यार्थी सौरभ शरद त्रिवेदी (एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रम) याला १३ पदके-पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. शासकीय विज्ञान संस्थेची विद्यार्थिनी रचना प्रकाश कनोजिया (बीएसस्सी) व श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सायली सुरेंद्र पेशवे (बीए) या दोघींचा प्रत्येकी १२ पदके-पारितोषिकांनी सन्मान झाला. 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठBanvarilal Purohitबनवारीलाल पुरोहित