शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांत गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या हव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार विद्यापीठाच्या प्राधिकरणांवर नामनिर्देशित सदस्यांचे प्रमाण जास्त आहे. सत्ताधारी पक्षांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार विद्यापीठाच्या प्राधिकरणांवर नामनिर्देशित सदस्यांचे प्रमाण जास्त आहे. सत्ताधारी पक्षांशी संबंधित लोकांची गुणवत्ता नसतानादेखील प्राधिकरणांवर वर्णी लागत आहे. यामुळे शैक्षणिक दर्जा खालावण्याचा धोका आहे. त्यामुळेच विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यात यावी व गुणवत्तेवर आधारित नियुक्त्या व्हायला हव्या, अशी मागणी विद्यापीठ कायदा सुधारणा समितीसमोर सोमवारी करण्यात आली.

विद्यापीठ कायद्यात सुधारणांसाठी राज्य शासनाने डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली चौदा सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीने सोमवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात बैठक घेतली. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाचेदेखील अधिकारी उपस्थित होते. कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव, वित्त व लेखा अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून विविध सूचना घेण्यात आल्या. गुणवत्ता डावलून राज्यात सत्तेत असणारे पक्ष आपल्या विचारधारेच्या व्यक्तींची निवड करतात. त्यामुळे प्राधिकरणांत शैक्षणिक विषयांपेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व येते. प्राधिकरणांवर सदस्यांची नियुक्ती करताना त्यांच्या गुणवत्तेला महत्त्व द्यावे, अशी मागणी करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिशानिर्देशांनुसार विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी समितीसमोर करण्यात आली.