शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मानवी भावनांची सार्वत्रिकता मांडणारे नाट्य

By admin | Updated: October 4, 2015 03:26 IST

जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत:...

महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’चा प्रयोग नागपूर : जुन्या काळात असणारी एकत्र कुटुंबपद्धती, गावातील वातावरण आणि शहराची ओढ असणारा तरुण वर्ग. साधारणत: १९७५ ते ८५ हा काळ अनेक स्थित्यंतरांचा होता. परिस्थिती बदलत होती आणि गावातील वातावरण. जुने लोक जुने सोडायला तयार नव्हते आणि नवी पिढी शहरातील आधुनिक राहणीमानाकडे, नोकरी, पैसा याकडे स्वाभाविकपणे आकर्षित होत होती. पण गावातील शेती, घरातील मोठ्या माणसांचा आदर करण्याची मूल्य, परंपरा पाळताना त्याचा अब्रूशी असणारा तत्कालिक विचार आणि यातूनच प्रत्येकच पिढीत असणारा नव्या-जुन्याचा संघर्ष हे सारेच आपण सातत्याने आजूबाजूला अनुभवत असतो. या सगळ्यांचा संबंध थेट मानवी भावनांशी, त्याच्या स्वार्थाशी आणि आपुलकीशीही आहे. काळ बदलला, प्रश्न बदलले पण मानवी गुंतागुंत वेगवेगळ्या प्रवाहाने सारखीच आहे. मानवी भावनांची हीच सार्वत्रिकता मांडणारे नाट्य म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’. जिगिषा आणि अष्टविनायक निर्मित या नाटकाचे दोन प्रयोग शनिवारी डॉ. देशपांडे सभागृहात सिद्धीविनायक पब्लिसिटीने आयोजित केले होते. या नाटकाची पार्श्वभूमी विदर्भातील असल्याने वऱ्हाडी भाषा आणि लेखक महेश एलकुंचवार नागपूरचे असल्याने रसिक नाटकाशी अधिक ‘रिलेट’ झाले. खूप अलंकृत संवाद नाही, घटनांची फारशी गुंतागुंत नाही आणि काही वेळेला संथ होणारे नाटक म्हणजे सहजपणे घरात घडणाऱ्या घटना, चर्चा, राग, लोभ या भावना अनुभवताना नकळत रसिकांनाही या साऱ्या घटना त्यांच्याच आयुष्यात घडल्यासारख्या वाटतात, हेच या नाटकाचे यश आहे. नाटक बऱ्याच प्रसंगात संथ होत असले तरी हा संथपणाच या नाटकाचा अवकाशही आहे आणि हा अवकाश अर्थपूर्ण आहे, याची प्रचिती पाहताना येते. मुळात सर्वच कलावंतांनी अगदी सहज केलेला अभिनय, गोळीबंद संहिता आणि संहितेचा विचार करून केलेले दिग्दर्शन यामुळे हे नाटक रसिकांना बांधून ठेवणारे होते. यात निवेदिता जोशी-सराफ, भारती पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, नेहा जोशी, पौर्णिमा मनोहर, प्रतिमा जोशी, विनिता शिंदे, अजिंक्य ननावरे, वैभव मांगले आणि प्रसाद ओक यांच्या भूमिका आहेत. देहबोली आणि परिणामकारक टायमिंग, सहज होणारी संवादफेक हे या कसलेल्या कलावंतांचे वैशिष्ट्यच होते. २० वर्षानंतर रंगभूमीवर आलेले ‘वाडा चिरेबंदी’ आत्ताच्या पिढीला प्रथमच अनुभवता आले. (प्रतिनिधी)