शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला,

जितेन्द्रनाथ महाराज : राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला प्रारंभ नागपूर : हिंदू समाजाची एकजूट जेव्हा झाली तेव्हा भारतात बंधूतेचे वातावरण आले आणि सारेच आनंदात राहिले. हिंदू समाज जेव्हा विघटित झाला तेव्हा मात्र परकीयांची आक्रमणे झाली आणि देश गुलामगिरीत गेला, याचा इतिहास आहे. आज बऱ्याच काळानंतर हिंदू समाज एकत्रित होतो आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही आपल्याला दिसत आहेत. हिंदू एकजूट होत असल्याचे पाहून मात्र जग काळजीत पडले आहे. जगात हिंदू धर्मच शांतता निर्माण करू शकतो आणि जगाला मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे हिंदूंची एकजूट हाच विश्वधर्म आहे, असे मत देवनाथ पीठाचे आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी गुरुवारी केले. कीर्तन महोत्सव आयोजन समिती, महाल आणि राधागोविंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाचे आयोजन चिटणीस पार्क, महाल येथे करण्यात आले आहे.या महोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी द्वितीय मधुराद्वैताचार्य श्री बाबाजी महाराज पंडित कीर्तन परिसरात ‘देव, देश आणि धर्म’ विषयावरील उद्बोधनात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. बनवारीलाल पुरोहित, दिलीप गुप्ता, प्रकाश वाघमारे, संयोजक श्रीपाद रिसालदार उपस्थित होते. महाराज म्हणाले, भगवान दत्ताला तीन मुखे आहेत तसेच देव, देश आणि धर्म आहे. देशाशिवाय देव नाही आणि देवाशिवाय देश नाही. धर्मपालनाशिवाय मात्र देव आणि देश यांचा काहीही अर्थ उरत नाही. हिंदूच्या एकजूटीने प्रथमच भारतीय संसदेला भारतमातेचे सर्वोच्च मंदिर म्हणणारा आणि त्याच्यासमोर नतमस्तक होणारा पंतप्रधान आपल्याला लाभला. देशाच्या प्रगतीसाठी भविष्यातही हिंदूंना एकजूट वाढवावी लागेल. भारताविषयी उपेक्षेने बोलणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना आज तिरंग्याला सलाम करण्यासाठी भारतात येण्याची इच्छा आहे. पण काही लोक जाणीवपूर्वक हिंदूंची एकजूट तोडण्याचा प्रयत्न करीत आहे. जातीच्या नावावर आरक्षण देऊन हा भेद वाढविला जातो आहे. आरक्षणाला विरोध नाही पण ते जातीच्या आधारापेक्षा कमजोर वर्गाला दिले गेले पाहिजे. आपल्या देशात शिवाजी महाराजांचे चरित्र इयत्ता पहिली ते पाचवी शिकविले जाते. या काळात मुलांना काहीही कळत नाही. पाचवीनंतर मात्र कळायला लागल्यावर ब्रिटिशांचा इतिहास शिकविला जातो. राज्य शासनाने यात बदल करायला हवा. विकास महत्त्वाचा आहे पण त्याने संस्कार संपायला नको, असे ते म्हणाले. संस्कार संपत असल्याने आमची संवेदनशीलता आणि नात्यांमधली वीणही सैल होते आहे. विकास हवा आहे पण संस्कारांसोबत हवा आहे. त्यासाठी आपला धर्म, देश आणि संस्कृती यांची जपणूक करण्याची गरज आहे. देशासमोर अनेक धोके आहे आणि त्यांना शह देण्याची शक्ती हिंदूच्या संघटनेतच आहे, यासाठी हिंदूंनी संघटित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी कीर्तन महोत्सव समितीच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महाल परिसरात या शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वेदशास्त्रसंपन्न सूरज वाशिमकर आणि सहकारी यांनी अथर्वशीर्षाचे पठण केले. या महोत्सवाला दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहकार्य लाभले आहे. (प्रतिनिधी)