शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

श्लोक मूर्ती व चित्रांचे अनोखे प्रदर्शन

By admin | Updated: June 13, 2014 01:25 IST

बहुचर्चित पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे श्लोक प्रदर्शन जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनातील प्रवेश सुरू झाले असून २० जून २०१४ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे. विदर्भातील सर्व

नागपूर : बहुचर्चित पेंटिंग, मूर्ती व चित्रांचे श्लोक प्रदर्शन जुलै महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या वर्षीच्या प्रदर्शनातील प्रवेश सुरू झाले असून २० जून २०१४ ही प्रवेशाची अंतिम तारीख आहे. विदर्भातील सर्व कलाकारांसाठी ही सुवर्णसंधी असून कलाकारांची तीन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. यात पेंटिंग, मूर्ती, ग्राफिक्स प्रिंट यांचा समावेश असेल. प्रदर्शनात कलाकारांना दोन्ही गटात पुरस्कार मोबदला व प्राविण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी कलाकाराला आपल्या पेंटिंगच्या छायाचित्रामागे महाविद्यालयाच्या ओळखपत्राची अ‍ॅटेस्टेड केलेली छायाप्रत लावावी लागेल. या प्रदर्शनात सहभागी होणारे व्यावसायिक व इतर कलाकार पदवीधर असावेत, तसेच कलाकाराचे ३-४ सोलो एक्झिबिशन किंवा ग्रुप एक्झिबिशन झालेले असावेत. फोटो प्रवेशाच्या वेळी कलाकाराने आपला बायोडाटा सोबत द्यावा. प्रवेशासाठी जमा केलेली छायाचित्रे परत केली जाणार नाहीत. प्रत्येक कलाकार चार पेंटिग्ज पाठवू शकेल.विद्यार्थी कलाकारांना प्रति पेंटिंगसाठी १५० शुल्क जमा करावे लागणार आहे. व्यावसायिक व इतर कलाकारांकडून प्रति पेंटिंग ३०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. कोणत्याही कारणाने भरलेली फी परत केली जाणार नाही. सर्व पेंटिंगच्या मागे कलाकाराचे नाव, जन्मतारीख पत्ता, पेंटिंगचे शीर्षक, माध्यम, आकार, मूल्य इत्यादी तपशील असावा. प्रदर्शनासाठी पाठवावयाच्या चित्राच्या कॅनव्हासचे आकारमान ३ फूट बाय ३ फूट निश्चित करण्यात आले असून फ्रेमची मोडतोड झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित कलाकारांचीच राहील. माउंट बोर्डवरील पेंटिंग स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रदर्शनासाठी निवड झालेली वॉटर कलर व चारकोलने रेखाटलेली चित्रे अ‍ॅक्रॅलिक काचेच्या फ्रेममध्ये असावीत. प्रदर्शनात पेंटिंग व इतर कलाकृतींची विक्री होऊ शकेल. यासंदर्भात अंतिम निर्णय आयोजन पथकाकडे राहील. या प्रदर्शनामुळे सर्व कलाकारांना एक व्यासपीठ मिळणार आहे. या प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी ९४२३६८०५११ / ९४२३६२८५०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)