शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अनोखा दिवाळी उत्सव; चिमुकल्यांनी अनुभवली नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 11:13 IST

दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व काय? हे मुलांमध्ये रुजविण्यासाठी सेवासदन सक्षम स्कूलमध्ये अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देचिमुकल्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले दिवाळीचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिमुकल्यांच्या कल्पनेत दिवाळी म्हणजे गोडधोड, कपडे आणि फटाके. पण दिवाळी का साजरी करतात, त्या मागची परंपरा काय?, दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्त्व काय? हे मुलांमध्ये रुजविण्यासाठी सेवासदन सक्षम स्कूलमध्ये अनोखा दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला.दिवाळीच्या सुट्ट्या येत्या सोमवारपासून लागणार आहे. मुलांमध्ये सुट्यांचे आणि या आनंदाच्या उत्सवाचे कुतूहल आहे. सेवासदन सक्षम स्कूलच्या मुलांची यंदाची दिवाळी वेगळी राहणार आहे.कारण शाळेने त्यांच्या मुलांना दिवाळीचे महत्त्व एका वेगळ्या पद्धतीने पटवून दिले आहे. मुलांकडून तयार करण्यात आलेल्या आकाशकंदीलांची आरास, आकर्षक रांगोळ्यांनी सजविलेला शाळेचा परिसर आणि राम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण, म्हैशासूर, वामन बटूच्या वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले होते. रावणाचा वध करून प्रभू श्री रामाचे अयोध्येत आगमन झाल्यानंतर अयोध्येत घरोघरी दीपमाळा लागतात आणि दीपांच्या या दिवाळी उत्सवाला सुरुवात होते.वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षकपणे प्रभू श्रीरामाचे आगमन, राज्याभिषेक सोहळा साजरा करून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली. दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस यानिमित्त विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागाचे दर्शन घडविले. धनत्रयोदशीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी बाजारपेठेचे चित्र निर्माण केले.श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून नरकचतुर्थी साजरी केली. लक्ष्मीचे पूजन, बलीप्रतिप्रदेचे महत्त्व वेगवेगळ्या प्रांतात साजरी केलेली जाणारी भाऊबीज आणि तुळशी विवाहाचे महत्त्व अतिशय आकर्षकपणे आणि विविध वेषभूषाकडून पटवून दिले.मुलांचे हे कौतुक बघण्यासाठी पालकांनीही गर्दी केली होती. दिवाळीचे महत्त्व आणि ती कशी साजरी करावी, याचा अनुभव बालकांबरोबरच पालकांनाही आला.

एस.एम. जोशी यांच्या संकल्पनेतून ही दिवाळी साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. यातून मुलांना आणि पालकांनाही दिवाळीचे महत्त्व, त्यामागणी परंपरा अनुभवायला मिळाली.- पद्मजा मराठे, प्राचार्य

टॅग्स :Diwaliदिवाळी