शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

संघ लोकसेवा आयोग : नागपूरचे निखिल दुबे यांना ७३३ वी रॅँक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:35 IST

संघ लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी २०१९ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये नागपूरचे निखिल सुधाकर दुबे यांनी ७३३ व्या एआयआर रॅँकिंगसह यश मिळविले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संघ लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी २०१९ परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये नागपूरचे निखिल सुधाकर दुबे यांनी ७३३ व्या एआयआर रॅँकिंगसह यश मिळविले. विशेष म्हणजे हे यश त्यांनी दुसऱ्यांदा प्राप्त केले आहे. २०१८ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना भारतीय माहिती सेवा, दिल्ली येथे त्यांचे प्रशिक्षण सुरू होते आणि यावेळी त्यापेक्षा वरच्या रॅँकने ते उत्तीर्ण झाले आहेत.निखिल दुबे दहावीपर्यंत सेंटर पॉईंट तर १२ वी शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. त्यानंतर बीआयटी, रांची येथून अभियांत्रिकी व दिल्लीमधून एमबीए पूर्ण केले आहे. काही दिवस खासगी नोकरी केल्यानंतर २०१५ पासून यूपीएससीची तयारी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे वडील सुधाकर दुबे हे फिशरी विभागातून सहायक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. वडिलांकडूनच यूपीएससीची प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवस त्यांनी नागपूरच्या प्रशासकीय सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण केंद्रात अभ्यास चालविला होता. त्यानंतर काही दिवस पुण्यात राहून तयारी केली. २०१८ मध्ये यशस्वी झाल्यानंतर दिल्ली येथे माहिती विभागात त्यांना पद मिळाले होते व त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेताना त्यांना दुसऱ्यांदा यश मिळाले.यूपीएससी सारख्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी परीक्षा केंद्रीत स्मार्ट स्टडी गरजेची असल्याचे मत निखिल यांनी व्यक्त केले. रट्टा मारण्यापेक्षा समजून अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. आवडत्या विषयात जास्त वेळ घालविण्यापेक्षा सर्व विषय कव्हर होतील, हे महत्त्वाचे आहे. कुठल्याही विषयावर इतरांशी चर्चा करण्यास व यशस्वी झालेल्या वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्यात संकोच बाळगू नये. तणाव घेऊ नका आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम ठेवा, असे आवाहन निखिल दुबे यांनी केले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगnagpurनागपूर