शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर बेरोजगारीची कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:22 IST

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देराज्यातील ७१२ कर्मचाºयांची नोकरी गेली : नागपुरात सीईओ यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या ८ ते १० वर्षापासून सेवा देणाºया या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शासनाने दिल्याने राज्यातील ७१२ कर्मचाºयांची सेवा संपली आहे. रोजगार देण्याचा दावा करणाºया सरकारकडून असलेला बेरोजगारीच्या अंधारात ढकलण्यात आल्याचा आरोप या कर्मचाºयांनी केला आहे.नागपूर जिल्ह्यातील बेरोजगार झालेल्या या कर्मचाºयांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाºयांना निवेदन सोपविले. शिष्ठमंडळातील प्रतिनिधी रोहित जयस्वाल यांनी सांगितले की, राष्टÑीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) अंतर्गत २००७ पासून पीएचसीमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्ती होत आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी त्यांच्या कंत्राटाचे नुतनीकरण करण्यात येते. यावर्षीही एप्रिल २०१७ मध्ये या कर्मचाºयांचे कंत्राट रिन्यू झाले असून मार्च २०१८ पर्यंत त्यांच्या नियुक्तीची मुदत आहे. मात्र राज्य शासनाने मुदतीपूर्वीच ३१ आॅक्टोबरला प्रयोगशाळा तंत्रज्ञांची पदे नामंजूर करून या सर्व कर्मचाºयांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढले. त्यामुळे हे सर्व कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांना कायम करण्याचे आणि सर्वोच्च न्यायालयाने समान काम समान वेतन या तत्त्वावर त्यांना सामावून घेण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार एका समितीची स्थापना करण्यात आली होती. मात्र शासनाने त्यापूर्वीच नियुक्त रद्द करून त्यांच्यावर संकट ओढवल्याचे रोहित जयस्वाल यांनी सांगितले. गेल्या १० वर्षापासून हे कर्मचारी केवळ ८००० रुपये या नाममात्र वेतनावर सेवा देत आहेत. याअंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांचे मलेरिया तपासणीसह टीएलसी, डीएलसी, एचबी, प्लेटलेट्स, एचआयव्ही, ब्लड शुगर, हिपॅटेटीस, स्पुटॉन, व्हिडॉल, आरडीके, युरीन मायक्रोस्कोपी, बीटी/सीटी, युपीटी आदी आजारांची तपासणी करण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द केल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होणार आहे. या कर्मचाºयांना सात दिवसात पूर्ववत कामावर न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमारे आमरण उपोषण करण्याचा इशारा या कर्मचाºयांनी दिला आहे. शिष्टमंडळात मनोज शिवणकर, शुभांगी साठवणे, श्रद्धा दरेकर, शितल ठेलकर, प्रीती शिरपूरकर, दर्शना निव्वळ, पांडुरंग नौकरकर, विजया तलमले, परिना शेख आदींचा समावेश होता.