शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांच्या ‘कार्टेल’ला बेरोजगार अभियंत्यांचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:37 IST

ऑनलाईन निविदेच्या या काळात ठेकेदार आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी ‘कार्टेल’ (साखळी) बनवून काम करीत आहेत. आपल्या मनानुसार दर मिळावे म्हणून सामूहिकपणे निविदेवर बहिष्कार घालून व्यवस्थापनाला अधिक दर देण्यासाठी बाध्य करणे एक परंपरा झाली आहे.

ठळक मुद्देमहावितरणतर्फे दिले जात आहे काम स्वतंत्र पोर्टल बनवण्यात आले

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन निविदेच्या या काळात ठेकेदार आपले म्हणणे मान्य करवून घेण्यासाठी ‘कार्टेल’ (साखळी) बनवून काम करीत आहेत. आपल्या मनानुसार दर मिळावे म्हणून सामूहिकपणे निविदेवर बहिष्कार घालून व्यवस्थापनाला अधिक दर देण्यासाठी बाध्य करणे एक परंपरा झाली आहे. परंतु महावितरणने ठेकेदारांचे ‘कार्टेल’ तोडण्याचा उपाय शोधून काढला आहे.महावितरणने आता बेरोजगार अभियंत्यांना आपले शस्त्र बनवले आहे. याचे दोन फायदे होत आहेत. एकतर महावितरणला काम करण्यासाठी प्रशिक्षित लोकं मिळत आहेत आणि दुसरे म्हणजे बेरोजगार अभियंत्यांनाही काम मिळत आहे. महावितरणमध्ये ठेकेदार ‘कार्टेल’ साखळी बनवून काम करीत आहेत. वार्षिक देखभाल(मेंटेनन्स)चे टेंडरही याच कारणामुळे आतापर्यंत कुणाला देता आलेले नाही. ठेकेदारांचे म्हणणे आहे की, कंपनीने जे दर (रेट) दिले आहेत, ते खूप कमी आहेत. अशा परिस्थितीत काम करणे शक्य होणार नाही. ठेकेदारांसोबत झालेल्या बैठकीत महावितरणने दरांमध्ये वाढ करून मंजुरीसुद्धा दिली. परंतु ठेकेदारांनी मान्य केले नाही. अजूनही मेंटेनन्सचे काम वितरित झालेले नाही. अशा परिस्थितीत विजेची ट्रिपिंग (वीज बंद होणे) सामान्य बाब झाली आहे.यापूर्वी उच्च दाब वितरण यंत्रणा(एचव्हीडीएस)सोबतही असे झाले होते. या योजनेंतर्गत कृषी पंपधारकांना स्वतंत्र ट्रान्सफार्मर दिले जात आहेत. परंतु या कामाला सुरुवात करण्यास महावितरणला मोठा त्रास झाला. ठेकेदारांनी कार्टेल बनवून महावितरणला निविदांचे दर वाढवण्यासाठी बाध्य केले. काम सुरू झाले. परंतु या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे काम वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. शेतकऱ्यांना कृषी पंप कनेक्शन देण्याचे कामही अडकून पडले आहे.सध्या या ‘कार्टेल’ला तोडण्याचे शस्त्र महावितरणच्या हाती लागले आहे. बेरोजगार अभियंत्यांना काम देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून काम मागणाऱ्यांना प्राधान्याने काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुढाकारामुळे ठेकेदारही हादरले आहेत.

७३ बेरोजगार अभियंता नोंदणीकृतबेरोजगार अभियंत्यांना काम देण्याचा निर्णय तसा जुनाच आहे. परंतु ठेकेदारांनी योजनाबद्ध पद्धतीने ‘कार्टेल’ बनवल्यानंतर महावितरणने बेरोजगार अभियंत्यांना प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेरोजगार अभियंत्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिलेले आहेत. याच अंतर्गत अधिकाधिक कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्याचा निश्चय करीत स्वतंत्र पोर्टल सुरु करण्यात आला आहे. नागपूर ग्रामीण भागात आतापर्यंत ७३ बेरोजगार अभियंत्यांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यांना आतापर्यंत ५४ कामे वितरित करण्यात आलेली आहेत. ६६३.१८ लाख रुपये किमतीची ही कामे आहेत. ही सर्व कामे डीपीसीची आहेत. आता बेरोजगार अभियंत्यांना मेटेंनन्सचे काम देण्याची तयारी केली जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण