शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘आम्ही सीमेवर जाऊ’ म्हणण्यामागचा मनोभाव समजून घ्या : सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 20:53 IST

देश हा सर्वोपरी आहे. देशावर एखादे संकट घोंगावत असेल त्यावेळी देशाच्या रक्षणार्थ एखादी व्यक्ती वा संघटना ‘लष्कराच्या सोबतीने आम्ही सीमेवर जाऊन लढू’ असे विधान करीत असेल तर त्या विधानामागचा त्या व्यक्ती वा संघटनेचा मनोभाव समजून घ्या, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात’ या सरसंघचालकांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले.

ठळक मुद्देस्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

(भाषाप्रभू पु. भा. भावे साहित्य परिसर)नागपूर : देश हा सर्वोपरी आहे. देशावर एखादे संकट घोंगावत असेल त्यावेळी देशाच्या रक्षणार्थ एखादी व्यक्ती वा संघटना ‘लष्कराच्या सोबतीने आम्ही सीमेवर जाऊन लढू’ असे विधान करीत असेल तर त्या विधानामागचा त्या व्यक्ती वा संघटनेचा मनोभाव समजून घ्या, अशा शब्दात लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात’ या सरसंघचालकांच्या वक्तव्याचे अप्रत्यक्ष समर्थन केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीतर्फे नागपुरात आयोजित द्विदिवसीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावर आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि जलस्रोत मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या. लोकसभाध्यक्ष पुढे म्हणाल्या, सावरकरांच्या विचारांचा जागर मांडणारे हे संमेलन समरसतेचे प्रतीक आहे. सावरकर स्वातंत्र्यानंतर जन्माला आले असते तर ते एक उत्तम साहित्यिकच झाले असते. आज कसे जगायचे, याचे आदर्श उदाहरण शोधायला गेलो तर ते सापडत नाही; पण सावरकरांनी आपल्या कृतीतून असा आदर्श उभा केला आहे. त्यांची स्वातंत्र्याप्रतिची भावना जाज्वल्यपूर्ण होती. आज काही मंडळी म्हणतात, स्वातंत्र्य लढ्यात तुमचे योगदान काय? पण जे म्हणतात त्यांचे प्रत्यक्ष काय योगदान आहे हेही त्यांनी कधी सांगितले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘जयोस्तुते’ या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या संमेलनाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे शिरीष दामले, डॉ. अजय कुळकर्णी, भिकूजी इदाते, रवींद्र साठे, अरुण जोशी, रणजित सावरकर, वामनराव तेलंग, प्रकाश एदलाबादकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या संमेलनाच्या आयोजनामुळे सावरकर समजून घ्यायला मदत होईल, असा विश्वास स्वागताध्यक्ष कांचन गडकरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सचिव डॉ. अजय कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. विवेक अलोणी व शुभा साठे यांनी तर आभार मिलिंद कानडे यांनी मानले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनliteratureसाहित्य