शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीसी कलम ४८२ मध्ये हायकोर्टाला अमर्याद अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 23:12 IST

फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.

ठळक मुद्देअ‍ॅड. राजेंद्र डागा यांची माहिती : हायकोर्ट बार असोसिएशनचे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) यातील कलम ४८२ मध्ये उच्च न्यायालयाला अमर्याद अधिकार देण्यात आले आहेत. या अंतर्गत उच्च न्यायालय विवेकबुद्धीच्या आधारावर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी करून घेणे, कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग थांबवणे व पक्षकाराला योग्य न्याय मिळवून देणे याकरिता आवश्यक तो निर्णय देऊ शकते अशी माहिती प्रसिद्ध फौजदारी वकील अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी दिली.हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या वतीने स्टडी सर्कल उपक्रमांतर्गत अ‍ॅड. डागा यांचे ‘फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ चे पैलू’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत कलम ४८२ मधील अधिकार स्पष्ट केले आहेत. त्यात हरियाणा सरकार वि. भजनलाल, नरेंद्र सिंग वि. पंजाब सरकार, मध्य प्रदेश सरकार वि. लक्ष्मी नारायण इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे. या अधिकारांतर्गत उच्च न्यायालय एफआयआर, दोषारोपपत्र, तडजोडीयोग्य प्रकरणे, दिवाणी वाद, व्यावसायिक व्यवहार इत्यादी प्रकरणे केवळ प्राथमिक मुद्दे विचारात घेऊन रद्द करू शकते. असे असले तरी वकिलांनी या कलमांतर्गत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यापूर्वी स्वत:च विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे. संबंधित प्रकरण कायद्यात बसत असेल तरच याचिका दाखल करावी. निरर्थक याचिका दाखल करून न्यायालयावर कामाचे ओझे वाढवू नये. पक्षकारांना विश्वासात घेऊन कायद्याची बाजू स्पष्ट करून सांगावी असे अ‍ॅड. डागा यांनी पुढे बोलताना सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल