शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी घरकूल योजनेमध्ये ‘क’ वर्ग नगरपरिषदांचा समावेश

By admin | Updated: August 29, 2014 01:55 IST

पश्‍चिम वर्‍हाडात १२१ घरकूले

अमोल जायभाये, खामगावराजीव गांधी घरकूल योजनेमध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश केल्यानंतर, या नगरपरिषदांसाठी राज्य शासनाने २0 कोटीचा निधी राखीव ठेवला आहे. या निधीतून पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला आणि वाशिम या तीन जिलतील क वर्ग नगरपरिषदांना १२१ घरकूले मिळणार आहेत. राज्य शासनाने २२ ऑगस्ट रोजी राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेचे राजीव गांधी घरकूल योजना असे नामकरण करतानाच, त्यामध्ये क वर्ग नगरपरिषदांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे पश्‍चिम वर्‍हाडास १२१ घरकूले मिळणार आहेत. या योजनेंतर्गत १ कोटी ७८ लाख ८ हजार ७५0 रु. तीन जिल्ह्यांना मिळणार आहेत. इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आदिवासी घरकूल योजना या ग्रामीण भागात राबवण्यात येतात. मात्र शहरी भागातील नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. बदलत्या काळात शहरीकरण वेगाने झाले. परंतु शहरात नव्याने समावेश झालेल्या भागाचा विकास गतीने होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने या भागातील द्रारिद्रय रेषेखालील नागरिकांना या योजनेमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रोजगारासाठी स्थलांतर करुन क वर्ग नगरपरिषदांमध्ये वास्तव्यास आलेल्या नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.या योजनेसाठी राज्य शासनाने प्रति घरकुलाच्या अनुदानामध्येही वाढ केली आहे. त्यानुसार प्रति घरकूल १ लाख ३८ हजार ७५0 रु. मिळणार आहेत. त्यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा ११ हजार २५0 असणार आहे. अशाप्रकारे प्रति घरकु लासाठी १ लाख ५0 हजार रुपये इतका निधी उपलब्ध होणार आहे. या निधीचे वाटप महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर नगरपरिषदांना होणार आहे.*राज्यात घरकुलेराजीव गांधी घरकूल योजनेअंतर्गत सन २0१४-१५ मध्ये राज्यातील क वर्ग नगर परिषदांमध्ये १४४१ घरकू ले बांधण्याचे उद्दीष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यासाठी १९ कोटी ९९ लाख ३८ हजार ७५0 रु. निधी खर्च करण्यात येणार आहे.