शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपुरात अनियंत्रित स्टार बसने धडक दिल्यामुळे युवती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:44 IST

भाऊबीज साजरी करून स्कुटीवर परत येणारी एक युवती अनियंत्रित झालेल्या स्टार बसमुळे गंभीर जखमी झाली आहे. प्रतापनगर चौकात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाऊबीज साजरी करून स्कुटीवर परत येणारी एक युवती अनियंत्रित झालेल्या स्टार बसमुळे गंभीर जखमी झाली आहे. प्रतापनगर चौकात बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. समीक्षा सागर मेश्राम (२२) रा. डब्ल्यूसीएल कॉलनी, जरीपटका असे गंभीर जखमी झालेल्या युवतीचे नाव आहे. समीक्षाचे आईवडिल जयताळात राहतात. सोमवारी भाऊबीज असल्यामुळे समीक्षा माहेरी गेली होती. ती सीताबर्डीत एका खाजगी संस्थेत काम करते. सकाळी ११.३० वाजता स्कुटीवर ती जयताळावरून सीताबर्डीला जात होती. प्रतापनगर चौकात स्टार बस क्रमांक एम एच. ३१, ई. एन-०३९६ च्या चालकाने समिक्षाला धडक दिली. समीक्षा स्कुटीसह बसच्या समोरील चाकात अडकली. ती बसच्या चाकात काही अंतर घासत गेल्यामुळे गंभीर जखमी झाली. हे पाहून नागरिकांची गर्दी जमा झाली. प्रतापनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी समिक्षाला मेडिकलमध्ये पोहोचविले. तेथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. बस चालक नितीन सेलुकर ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे सांगत असून पोलिसांनी चौकशी करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालक