शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बाजारातील अनियंत्रित गर्दीमुळे चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 20:33 IST

Unlock crowd कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु सोमवारी पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देनियंत्रणाची एनडीएसवर जबाबदारी : नियम तोडल्यास दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु सोमवारी पहिल्याच दिवशी बाजारात प्रचंड गर्दी होती. या गर्दीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यात काही दुकानदारांनी सायंकाळी पाचपर्यंत वेळ असताना उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवली. याचा विचार करता उपद्रव शोध पथकाला (एनडीएस) शहरातील प्रमुख बाजार असलेल्या सीताबर्डी, महाल, इतवारी, खामला, जरीपटका, सक्करदरा आदी भागांतील गर्दी नियंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार आर्थिक दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले आहे.

सीताबर्डी, महाल, इतवारी बाजारात मंगळवारीही गर्दी दिसून आली. दुकानांतील गर्दीसोबत कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. नियमांचे कठोर पालन झाले नाही, तर पुन्हा संक्रमण वाढण्याचा धोका आहे. याचा विचार करता मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. दुकाने, हॉटेल, रेस्टाॅरंट आदींना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिला आहे.

... तर निर्बंध लावले जातील

अनलॉकनंतर पहिल्याच दिवशी बाजारात मोठी गर्दी होती. याचा विचार करता कोविड संक्रमण फार काळ नियंत्रणात राहणार नाही, असा धोका असल्याने दर शुक्रवारी अनलॉकचा आढावा घेतला जाणार आहे. ज्या भागात नियमांचे पालन होणार नाही. अशा परिसरात निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मनपा प्रशासनाने दिला आहे.

आठवडाभर ठेवणार नजर

सुरुवातीला काही दिवस बाजारातील गर्दी, दुकानदारांकडून नियमांचे पालन होते की नाही, यावर प्रशासनाची नजर राहणार आहे. नियमांचे उल्लंघन होत असल्यास निर्बंध लावण्याची तयारी करावी लागेल. यामुळे सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल, असा इशारा मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

सुपर स्प्रेडर्सची चाचणी आवश्यक

दुकानातील कर्मचारी, ठेलेवाले, रेस्टाॅरंट व हॉटेलमधील कर्मचारी, हॉकर्स, भाजीपाला विक्रेते आदींना कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. सोबतच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स अशा नियमांचे पालन करावे लागेल.

टॅग्स :Marketबाजारcorona virusकोरोना वायरस बातम्या