शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गोदामांमध्ये अनधिकृत साठा

By admin | Updated: June 5, 2016 02:58 IST

शासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे नागपूर जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थांची विक्री जोरात सुरू आहे.

गोदामांची तपासणी करा : मल्टीप्लेक्समध्ये जीवनावश्यक वस्तूंची तिप्पट दराने विक्रीनागपूर : शासकीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्यामुळे नागपूर जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थांची विक्री जोरात सुरू आहे. एवढेच नव्हे तर अनधिकृत गोदामांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड साठा असून अधिकाऱ्यांची नियमित तपासणी आणि चौकशी मात्र शून्य आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सर्व गोदामांची तपासणी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे. कालबाह्य पदार्थांचे पुन्हा पॅकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल कराभेसळखोरीचा धंदा अनियमित गोदामांमधून धडाक्यात सुरू आहे. यातून काळाबाजार, कालबाह्य पदार्थांचे रिपॅकिंग वाढले असून व्हॅट, सेवा कर आणि अन्य शासकीय करांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व गोदामांची तपासणी आणि अधिकृत नोंदणी व्हावी. यामुळे गोदाम कुणाचे आणि त्यात कुणाचा, कोणता आणि किती माल ठेवला आहे, याची सरकार दप्तरी नोंदणी होणार आहे. उपरोक्त सर्व बाबींची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना असून त्यांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप ग्राहक संघटनांनी लोकमतशी बोलताना केला. काही महिन्यांपूर्वी कालबाह्य झालेल्या पारले कंपनीच्या बिस्किटचे रिपॅकिंग केलेला माल पारडी येथील एका गोदामातून अन्न व औषध प्रशासन विभागाने ताब्यात घेतला होता. पुढील कारवाई थंडबस्त्यात आणि अनभिज्ञ आहे. याशिवाय या ठिकाणी अन्य कंपन्यांच्या पदार्थांच्या कालबाह्य पदार्थांचे रिपॅकिंग करीत असल्याचे आढळून आले होते. अशा गोदामांना अधिकाऱ्यांनी सील ठोकावे, अशी मागणी अ‍ॅन्टी अ‍ॅडल्टेशन कन्झुमर सोसायटीचे अध्यक्ष मो. शाहीद शरीफ यांनी लोकमतकडे केली आहे.मल्टीप्लेक्स व सिनेमागृहात शुद्ध पाण्याची मशीन बंधनकारकसिनेमा कायदा-१९६६ नुसार सिनेमागृहाच्या दरवाज्यासमोर शुद्ध पाण्याची मशीन लावणे बंधनकारक आहे. याचा परवाना पोलीस विभागातर्फे देण्यात येत असल्यामुळे नियमानुसार अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. उपरोक्त सर्व मुद्यांवर जूनमध्ये होणाऱ्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्हाधिकारी परिषदेचे अध्यक्ष आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या सहआयुक्तांनी वोक्हार्ट हॉस्पिटलची तपासणी करून अहवाल डीएसओ कार्यालयाकडे सोपविण्याची मागणी शरीफ यांनी केली आहे.