शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

युएन केंद्र दहशतवाद्यांचा अड्डा

By admin | Updated: July 31, 2014 01:02 IST

गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे

नागपूर : गाझापट्टीतील युएन केंद्र ‘हमास’या दशहतवादी संघटनेचा अड्डा असून तेथे ठेवलेल्या शस्त्रसाठ्याद्वारे इस्रायलवर हल्ले केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्यात आल्याचे कॉन्सूलेट जनरल आॅफ इस्रायलचे ‘डेप्युटी चिफ आॅफ मिशन’ मतान जमीर यांनी नागपूर येथे सांगितले.भारतातील सैनिकी शाळांची पाहणी करण्यासाठी जमीर नागपूर येथे आले होते. त्यांनी भोसला सैनिक शाळेला भेट दिल्यानंतर रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांचे लक्ष गाझापट्टीत सुरू असलेल्या हल्ल्याकडे वेधले असता त्यांनी वरील मत व्यक्त केले.गाझापट्टीतील युएन केंद्रावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात लहान मुलांसह मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचे वृत्त जगभर विविध वृत्त वाहिन्यांनी दाखविले होते. त्या संदर्भात बोलताना जमीर म्हणाले की, हे केंद्र ‘हमास’ या दशहतवादी संघटनेचे केंद्र झाले होते. तेथे संघटनेने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ठेवला होता. तेथून ते इस्रायलमधील शाळा, इस्पितळ आणि नागरी वस्त्यांवर हल्ला करीत होते. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत होती. ती टाळण्यासाठी व हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या केंद्रावर हल्ला करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.पॅलेस्टियनला देश म्हणून मान्यता देण्यात इस्रायलचा विरोध नाही, मात्र तरीही ‘हमास’कडून हल्ले होतच आहेत. आम्ही त्यांच्या लगत आहोत, त्यामुळे हे हल्ले अधिक तीव्र होत आहेत. असेच हल्ले पुढच्या काळात नायजेरियावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कट्टर मुस्लीम दहशतवादी संघटनांचा भारतासह इतरही देशांना धोका आहे, याकडे जमीर यांनी लक्ष वेधले.इस्रायलला संघर्ष नको, पण ‘हमास’मुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. तीनवेळा युद्ध विराम झाल्यानंतरही ‘हमास’कडूनच त्याचे उल्लंघन करण्यात आले. नागरी वस्त्या आणि लहान मुलांवर हल्ले करण्यात आले. कोणी हल्ले करीतच असेल तर किती काळ शांत बसायचे, त्याला प्रत्युत्तर द्यावेच लागते. या संघर्षात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होत आहे. १ हजार ८८ पॅलेस्टियन्स आणि ५६ इस्रायली नागरिक ठार झाल्याचे आकडे माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहे.मात्र या आकड्यावर जाऊ नका, रॉकेल मिसाईलचे हल्ले निकामी करण्याची अत्याधुनिक यंत्रणा इस्रायलने निर्माण केल्याने आमची मनुष्य हानी कमी झाली आहे, असे जमीर म्हणाले. (प्रतिनिधी)