शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

उमरेडच्या ‘सच्चिदानंद’ची पत घसरली

By admin | Updated: July 23, 2015 02:56 IST

बुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत.

अभय लांजेवार उमरेडबुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत. आपल्या घामाचा पैसा गुंतवल्यानंतर मुदतीअंती आपली रक्कम व्याजासह परत मागण्यासाठी अनेकजण या संस्थेच्या दोनमजली इमारतीत सध्या येरझाऱ्या मारीत आहेत. संस्थेत येणाऱ्यांना ‘सध्याच पैसे नाही, आणखी काही दिवस थांबा’ अशापद्धतीने थांबविले जाते. यामुळे आल्यापावलीच निराशेने परत जाण्याचा प्रकार गुंतवणूकदारांसोबत होत असून आपल्याच पैशासाठी अनेकदा चकरा मारणाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. तर दुसरीकडे संस्थेने जोरजबरदस्तीने ‘तारखेवर तारीख’ वाढवून देण्याचा सपाटाच सुरू केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत. उमरेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या जात असून दुय्यम निबंधक ‘तुम्ही मला विचारून रक्कम ठेवली होती का’ अशा शब्दात आमची हेटाळणी करीत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.सुमारे दीड-दोन वर्षांपासून संस्थेचे पदाधिकारी आपला हालहवाल लोकांपुढे पोटतिडकीने मांडत रकमेसाठी चालढकलपणा करीत आहेत. वर्ष उलटूनही अद्याप या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने या सहकारी पतपुरवठा संस्थेत पैसा गुंतवणे गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाहीना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. (क्रमश:)‘लाल’ झाले कोण?संस्थेलगत प्राचीन प्रसिद्ध लाल गणपतीचे मंदिर आहे. नेमके हेच नाव हेरून आणि भाविकांच्या आस्थेचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या अनुषंगाने संस्थेने ‘लाल गणपती’ या नावाने योजना आखली. पाच वर्षात दामदुप्पटीचे आमिषही नागरिकांना दाखविले. सन २००९-१० या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शेकडो लोकांनी उड्या मारल्या. जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभताच सन २०१०-११ या वर्षात ‘चिंतामणी योजना’ जाहीर झाली. या योजनेवरही अनेकजण तुटून पडले. सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. पाच वर्ष संपले. ठेवीचे सहावे वर्षही सुरू झाले. परंतु दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास या गुंतवणूकदारांना रक्कम परत करावयाची आहे. सोबतच यथाशक्ती मुदत ठेव योजनेतही एक, तीन आणि पाच वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली. ही रक्कमही अनेकांची संस्थेत अडकली आहे. अडकलेल्या रकमेचा हा गुंता संस्था सोडविणार कधी, असा सवाल शेकडो गुंतवणूकदार आता विचारीत आहेत. लोकमतविशेष