शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडचे ते रुग्ण ‘डेल्टा प्लस’बाधित नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:07 IST

नागपूर : जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ उमरेडच्या आठ रुग्णांमध्ये आढळून आला नसल्याने आरोग्य ...

नागपूर : जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणारा ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ उमरेडच्या आठ रुग्णांमध्ये आढळून आला नसल्याने आरोग्य यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाचा दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ दिसून आला आहे. नीरीने आठ दिवसांपूर्वी या रुग्णांचे नमुने घेऊन हैदराबादच्या ‘सीसीएमबी’ प्रयोशाळेत पाठविले होते. केवळ आठ दिवसांच्या आतच बुधवारी अहवाल प्राप्त झाला.

उमरेडमधील एका कुटुंबात लग्न सोहळ्यासाठी मुंबईहून आलेल्या एका महिलेकडून एकाच घरातील १० जण पॉझिटिव्ह झाले. सुरुवातीला आठ जणांमध्ये कोरोना झपाट्याने पसरल्याने त्यांचे नमुने नीरीच्या लॅबमध्ये तपासणीसाठी आले. येथील तज्ज्ञांना विषाणूमध्ये बदलाची शंका आली. यामुळे हे नमुने ‘जिनोम सिक्वेंन्सिंग’साठी हैदराबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलेक्युलर बायलॉजी’ प्रयोगशाळेत पाठविले. रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना उमरेडच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये ठेवण्यात आले होते. ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चे संशयित म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते; परंतु अहवालात जुना ‘डेल्टा व्हेरियंट’ आढळून आल्याने मोठे संकट टळल्याचे बोलले जात आहे.

‘डेल्टा प्लस’ची देशात २१ प्रकरणे

डेल्टा प्लस व्हेरियंटला ‘बी.१.६१७.२ स्ट्रेन म्हणूनही ओळखले जाते. भारतात फरिदाबाद, महाराष्ट्र, तामिळनाडू व मध्यप्रदेशात याचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत या ‘व्हेरिएंट’ची २१ प्रकरणे समोर आली आहेत. यात मुंबईमध्ये २, रत्नागिरीमध्ये ९, जळगावमध्ये ७, पालघर, ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येकी एक आहे. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या बदलांमध्ये ‘डेल्टा प्लस’ हा जास्त संक्रामक आहे. याच्या बाधिताला रुग्णालयात भरती करण्याची शक्यता २.६ टक्क्याने वाढते. या विषाणूमुळे रुग्ण गतीने गंभीर होण्याचा धोका अधिक असतो.