शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 10:56 IST

उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली.

ठळक मुद्दे चिकना गावालगतची घटनादुचाकीचालक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली.शेषराव बाबुराव रामटेके (२८, रा. चिकना) असे जखमीचे नाव आहे. ते पत्नी मंदा (३५) यांच्यासह उमरेड येथे दुचाकीने कामानिमित्त गेले होते. उमरेड येथून ते सायंकाळच्या सुमारास गावाकडे येण्यास निघाले. दरम्यान, चिकना गावापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर उडी मारली. त्यात शेषराव यांच्या डाव्या पायाला बिबट्याचा पंजा लागून पॅन्ट फाटला. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे रामटेके दाम्पत्य चांगलेच घाबरले. मात्र त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. यानंतर ते गावात आले आणि आपबिती पोलीसपाटलांना सांगितली. त्यांनी लगेच याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाची चमू लगेच गावात दाखल होऊन जखमी शेषराव यांना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले.याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, राऊंड आॅफिसर डी. बी. आरीकर यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. शेषराव रामटेके यांना तातडीची दोन हजार रुपयांची मदत वन विभागातर्फे करण्यात आली.

टॅग्स :leopardबिबट्या