शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उमरेड बलात्कार प्रकरण: कोलमाफियांसाठी सुरक्षेला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 11:05 IST

कोळसा तस्करीला वाट मोकळी करून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी मुद्दामहून सुरक्षेला खिंडार पाडले. त्याचमुळे उमरेडनजीकच्या गोकुल खदानमध्ये सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करण्याचा थरारक गुन्हा घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातकोळसा खाणीतील काळे वास्तव

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोळसा तस्करीला वाट मोकळी करून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी मुद्दामहून सुरक्षेला खिंडार पाडले. त्याचमुळे उमरेडनजीकच्या गोकुल खदानमध्ये सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करण्याचा थरारक गुन्हा घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या घटनाक्रमामुळे वेकोलिच्या वर्तुळात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.दिल्लीतील थरारक निर्भयाकांडाच्या आठवणी जागविणारे हे संतापजनक प्रकरण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडले. त्याची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खदानीशी सबंधित सूत्रांकडून लोकमतने या प्रकरणामागची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहे. उमरेडनजीक ही गोकुल खदान आहे.खदानीमधून रोज १०० ते १५० ट्रक कोळसा (२० ते ३० हजार टनांपेक्षा जास्त) बाहेर जातो. सकाळी ७ पासून ते सायंकाळी ६ पर्यंत कोळसा लोडिंग, अनलोडिंग आणि वजनाचे (काटा) काम खदान परिसरात चालते. कोळसा चोरी, तस्करी आणि अदलाबदलीचाही गोरखधंदा येथे चालतो.त्यासाठी ट्रकचालक, वाहकांच्या नावाखाली येथे विविध भागातील खतरनाक गुन्हेगार, कोळसा माफियांकडून पाठविले जातात. कोळसा तस्करीत अडसर येऊ नये म्हणून ते अधिकाऱ्यांचे खिसे गरम करतात. बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे संबंधित अधिकारीही कोळसातस्करांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या मार्गातील अडसर दूर करून देतात. मंगळवारी असेच झाले. अत्यंत संवेदनशील अशा या ठिकाणी धर्मकाट्यावर संबंधित अधिकाऱ्याने पीडित महिला कर्मचाऱ्याला नियुक्त केले. एरवी, त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड असतात. मंगळवारी येथे खाण व्यवस्थापकाच्या मर्जीतील व्यक्तींचे ट्रक तेथे कोळसा घेण्यासाठी येणार असल्यामुळे अडसर नको म्हणून दोन्ही गार्ड तेथून दुसरीकडे हटविल्याची चर्चा आहे. त्याचमुळे ट्रकचालक-वाहकाच्या रूपात तेथे आलेल्या गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या पीडित महिलेची अब्रू लुटली अन् आपले पाप लपविण्यासाठी तिची दगड-कोळशाने ठेचून निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न केला.अधिकाऱ्याचा दोष उघड ?या प्रकरणाने केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर संपूर्ण वेकोलि वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. वेकोलिच्या वरिष्ठांनी दोन दिवसांपासून या प्रकरणाला कुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याची चौकशी चालवली आहे. ज्या ठिकाणी ठिकठिकाणचे ट्रकचालक येतात, ज्यातील अनेकजण दारू, गांजा, अफिमच्या नशेत टून्न असतात, त्या ठिकाणी एका महिलेची ड्युटी लावण्यामागे कोणता उद्देश होता, तेथून दोन्ही गार्ड का हटविण्यात आले, त्याची चौकशी केल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाला खाण व्यवस्थापक जी. एस. राव यांचा हेकेखोरपणा जबाबदार असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. या संबंधाने राव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Rapeबलात्कार