शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १५ ठिकाणी उद्योग भवन बांधणार; विलासरावांच्या योजनेला ‘महायुती’चे बळ

By योगेश पांडे | Updated: December 15, 2023 09:32 IST

सर्वसाधारणत: सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांच्या योजनेला बंद करण्याचे किंवा त्यात बदल करण्यावर भर असतो.

योगेश पांडे

नागपूर : सर्वसाधारणत: सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांतील नेत्यांच्या योजनेला बंद करण्याचे किंवा त्यात बदल करण्यावर भर असतो. मात्र, महायुतीच्या सरकारने राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या जुन्या योजनेला परत नवे बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. विलासराव देशमुखांनी उद्योगभवन योजना राबविली होती. मात्र, काही कारणांनी ती बंद पडली. राज्यात १५ ठिकाणी  उद्योग भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकासांच्या योजनेत राजकारणाला दूर ठेवायला हवे, अशी भूमिका मांडत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत ही माहिती दिली.

जयंत पाटील यांच्या प्रस्तावावरून राज्यातील एमआयडीसी उद्योगांबाबतच्या विविध मुद्यांवर अल्पकालीन चर्चा झाली. यावेळी सामंत बोलत होते. विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्हापातळीवर उद्योग भवन बांधण्याचे निश्चित केले होते. त्याची सुरुवातही झाली व एक-दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणीदेखील झाली. मात्र, पुढे ती योजना बंद पडली. विलासराव देशमुखांची संकल्पना होती म्हणून आम्ही ती बंद ठेवायची असे होणार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये यासाठी तरतूद करण्यात आली आहे. १५ जिल्ह्यांत उद्योग भवन बांधण्यात येणार असून एकाच ठिकाणावरून उद्योगासाठीच्या विविध परवानग्या मिळतील असे सामंत यांनी स्पष्ट केले. अशा योजनांमुळे गडचिरोलीत विविध उद्योगांना परवानगी मिळण्यास अडचण जात नाही. आज गडचिरोलीची ओळख नक्षलप्रभावित जिल्हा असला तरी लवकरच राज्याची उद्योगनगरी म्हणून गडचिरोली ओळखला जाईल, असा दावा सामंत यांनी केला.

प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य प्रशिक्षण केंद्र

राजकारणविरहित प्रकल्प आले पाहिजे आणि हाच संदेश उद्योजकांपर्यंत गेला पाहिजे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित यायला हवे. बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास झाला पाहिजे. नागपूर, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व कळंबोली येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. कळंबोलीतील केंद्र तर सर्वांत मोठे केंद्र ठरणार आहे. संबंधित विभागांमधील एमआयडीसीला आवश्यक असलेल्या कौशल्यांना लक्षात घेऊन तेथे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.