मनपा रुग्णालयात टेक्निशियन तपासतो रुग्णनागपूर : मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. अनिल चिव्हाणे यांच्याकडे आहे. त्यांचाशी मोबाईलवर संपर्क साधून सुरू असलेल्या प्रकाराबद्दल विचारल्यावर त्यांनी सुटीवर असल्याचे सांगत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला पुरी यांच्याशी बोलण्यास सांगितले. खोली क्र.४ च्या मागे डॉ. मंगला पुरी गर्भवती महिलांना तपासत होत्या. प्रस्तुत प्रतिनिधीने डॉ. पुरी यांना भेटून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीला नकार दिला. परंतु त्यांच्याच ठिकाणाहून खोली क्र. ४ च्या खिडकीतून सुरू असलेला प्रकार दाखविल्यावर त्या टेक्निशियनला रुग्ण तपासायला मी सांगितले नाही, असे उत्तर दिले.रुग्णालयात केवळ एकच डॉक्टरमनपाच्या या रुग्णालयात प्रसूती व स्त्री रोग डॉक्टर चार, शल्यचिकित्सक एक, फिजिशियन एक व जनरल डॉक्टर एक असे सात डॉक्टर आहेत. परंतु शनिवारी सकाळी केवळ डॉ. पुरीच रुग्णांची तपासणी करताना आढळून आल्या. विशेष म्हणजे, प्रसूती वॉर्डात १५ खाटा असताना केवळ चार रुग्ण तर फिजिशियनच्या वॉर्डात केवळ एक रुग्ण भरती होता. फिजिओथेरपी केंद्रात डॉक्टरच्या डुलक्यामहानगरपालिकाद्वारा प्राधिकृत असलेले विश्वसेवा फिजिओथेरपी केंद्र याच रुग्णालयात आहे. या केंद्रात गेल्यावर एक महिला रुग्ण मशीनवर व्यायाम करीत होती तर केंद्रातील महिला डॉक्टर टेबलावर डोके टेकवून झोप घेत असल्याचे दिसून आले. दुपार २ नंतर गायब होतात डॉक्टररुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, हे रुग्णालय दुपारी २ वाजतापर्यंत कसेबसे सुरू असते. त्यानंतर कोणी डॉक्टर राहत नाही. दुपारी २ किंवा रात्री प्रसूतीसाठी येणाऱ्या रुग्णांना मेडिकल, मेयो व डागा रुग्णालयात पाठविले जाते. विशेष म्हणजे, रुग्णालयासमोर अपघात झाला तरी जखमी रुग्णावर साधी मलमपट्टी होत नाही.
वरिष्ठ डॉक्टरांच्या देखत चालतो प्रकार
By admin | Updated: November 15, 2015 01:59 IST