शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन तरुणांना चिरडले

By admin | Updated: September 22, 2016 03:05 IST

भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.

ट्रकची मोटरसायकलला धडक : मौदी फाट्याजवळ अपघातदेवलापार : भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. हा अपघात देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत पवनी नजीकच्या मौदी फाट्यापुढे बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास झाला. या अपघातामुळे संतापलेल्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत पोलीसही पोहोचले. त्यामुळे नागरिकांचा संतापाला आवर घालता आला. मृत तरुणांकडे आढळलेल्या कागदपत्रांवरून सागर कुंडलिक येवतकर (३०, रा. अमरावती) व सुरेश इसारी वानखेडे (३५, रा. येरला, जि. भंडारा) अशी नावे असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली. ते दोघेही एमएच-२७/बीएन-५३६८ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ने देवलापारकडे येत होते. दरम्यान मौदी फाट्यापुढे सीजी-०४/जे-९२५९ क्रमांकाच्या ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिली. या अपघातानंतर मोटरसायकल ट्रकमध्ये अडकल्याने मोटरसायकलसह दोघांनाही काही अंतरापर्यंत फरफटत नेले. त्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची ही माहिती देवलापार पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून आरोपी ट्रकचालक रनतेश रामलाल यादव (१९, रा. संजय वॉर्ड, शिवनी, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले. तसेच ट्रक पोलिसांनी जप्त केला. पुढील तपास ठाणेदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव पुजारी करीत आहे. (प्रतिनिधी)