शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

खुनातून निर्दोष मात्र दुखापतीत दोन वर्षे कारावास

By admin | Updated: December 29, 2016 02:49 IST

अनैतिक संबंधाच्या संशयावरून टाटा मॅजिकचालकाच्या झालेल्या खुनातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने

टाटा मॅजिक चालकाचे खून प्रकरण नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून टाटा मॅजिकचालकाच्या झालेल्या खुनातून अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली. मात्र दुखापतीचा गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. बंडू बापूराव बिलनकर (४६) रा. नवीन बिना तहसील सावनेर, असे आरोपीचे नाव असून राजू ज्ञानोबा बनकर रा. खापरखेडा, असे मृताचे नाव होते. राजू हा टाटा मॅजिक चालवून प्रवासी वाहतूक करायचा. प्रकरण असे की, आरोपी बंडू बिलनकर याला राजूचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे बंडूने अनेकदा राजूच्या घरी जाऊन समजावले होते. त्यांचे भांडणही झाले होते. ७ डिसेंबर २०१३ रोजी राजू हा आपली एमएच-४०-एन-७०१२ क्रमांची टाटा मॅजिक घेऊन कामावर गेला होता. घरी परतण्याची वेळ होऊनही तो घरी परतला नव्हता. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास मोहल्ल्यात राहणारा तिरथराम वाघमारे याने राजूच्या घरी जाऊन त्याची पत्नी शीतल राजू बनकर हिला बंडू बिलनकर हा श्याम मंगल कार्यालयासमोर राजूला मारहाण करीत असल्याचे सांगितले होते. शीतलने घटनास्थळ गाठले असता बंडू हा राजूला काठीने मारहाण करताना दिसताच तिने बंडूला बाजूला केले होते. राजूच्या नाकातोंडातून रक्त निघताना पाहून तिने शेजाऱ्यांच्या मदतीने आपल्या पतीला कामठी येथील खासगी इस्पितळात नेले होते. तेथील डॉक्टरांनी तपासून राजूला मृत घोषित केले होते. खापरखेडा पोलिसांनी भादंविच्या ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक आर. एस. कोहरे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या ३२४ कलमांतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास, तीन हजार रुपये दंड आणि भादंविच्या कलम ३०२ मधून निर्दोष सुटका केली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. उपनिरीक्षक डी. एन. म्हात्रे, सहायक फौजदार दिलीप कडू, अरुण भुरे, हेड कॉन्स्टेबल अशोक शुक्ला आणि भवानीप्रसाद मिश्रा यांनी सहकार्य केले.