शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरी जास्त काम करेन, पण पोरीला शिकवेनच

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

तिच्या नावातच ‘यश’ सामावले आहे. अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली अन् गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहत तिने यशाचा

योगेश पांडे ल्ल नागपूरतिच्या नावातच ‘यश’ सामावले आहे. अंगभूत हुशारीला कष्टांची जोड मिळाली अन् गरिबीच्या संघर्षलाटेवर पोहत तिने यशाचा किनारा गाठला. परंतु यानंतर प्रश्न उभा ठाकला, पुढे काय ? पण येथे तिच्या माऊलीचा खांद्यावर हात पडतो, ‘पोरी, तू लढत रहा. मी तुझ्या पाठीशी आहे’. मुलींच्या शिक्षणासाठी अहोरात्र झटणारी ती माऊली आता कंबर कसून तयार झाली आहे. आणखी जास्त काम करेल, पण मुलींना शिकवूनच राहील. शिक्षणाच्या बाबतीत अजिबात वाकणार नाही, अशी भूमिका घेतलेली ही आई खरोखर ‘लेकी वाढवा, लेकी शिकवा’ या घोषणेला प्रत्यक्षात उतरवत आहे.गजानन विद्यालयातील विद्यार्थिनी असलेल्या यशश्री सुधीर सुलभेवार हिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. तिचे वडील ‘मंडप’ टाकण्याचे काम करतात. तर आई शारदा घरोघरी जाऊन स्वयंपाक करते. चार मुली असल्याने त्यांचा शिक्षणाचा खर्च पेलता पेलताच या दाम्पत्याच्या नाकी नऊ येतात. घर अतिशय लहान, अभ्यासाला जागा कमी अशा स्थितीतदेखील यशश्रीने हार मानली नाही. तिने दहावीच्या वर्षभर मन लावून अभ्यास केला आणि थोडेथोडके नव्हे तर चक्क ९४.६० टक्के गुण मिळविले. यशश्रीला अभियंता होण्याची फार इच्छा आहे. परंतु तिच्या दोन मोठ्या बहिणींचे अगोदरपासूनच शिक्षण सुरू आहे. सर्वात मोठी बहीण अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेत आहे आणि त्याहून धाकटी बहीण वाणिज्य शाखेला आहे. पोटाला चिमटा घेऊन या पोरींचे शिक्षणाचा खर्च कसाबसा उचलणाऱ्या सुलभेवार दाम्पत्याला चिंता आहे ती तिसऱ्या मुलीच्या शिक्षणाची. परंतु काहीही झाले तरी यशश्रीला हवे तेच शिक्षण घेऊ देणार असा संकल्प तिच्या आईने केला आहे. यासाठी वेळ पडली तर आणखी दोन घरी स्वयंपाक करेन, असे तिच्या आईने सांगितले. यशश्रीला विश्वास आहे की ती एक दिवस नक्की अभियंता होईल व घरच्यांचे स्वप्न पूर्ण करेल.