लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील काटाेल-सावरगाव मार्गावरील डाेंगरगाव परिसरात केलेल्या कारवाईमध्ये दुचाकी वाहने चाेरणाऱ्यास अटक केली. त्याच्याकडून दाेन माेटरसायकली व एक ॲक्टिव्हा अशी तीन वाहने जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि. १८) करण्यात आली.
केन ऊर्फ ज्ञानेश्वर वासुदेव गायकवाड (१९, रा. सावरगाव राेड, काटाेल) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काटाेल परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना डाेंगरगाव परिसरात एक तरुण संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्याच्याकडील माेटरसायकल चाेरीची असल्याची शंका आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलीस अधिकाऱ्यांनी त्याला शिताफीने ताब्यात घेत विचारपूस केली. त्याला माेटरसायकलचे कागदपत्र मागितले असता, त्याने असंबद्ध उत्तरे दिली. त्यामुळे पाेलिसांनी त्याची कसून चाैकशी केली. त्यात त्याने त्याच्याकडील माेटरसायकल चाेरीची असल्याचे सांगितले.
त्याने एमएच-४०/डब्ल्यू-६६६१ क्रमांकाची माेटरसायकल, काटाेल शहरातील गळपुरा एमएच-४०/एच-३४४० क्रमांकाची ॲक्टिव्हा येरला, ता. कळमेश्वर व विना क्रमांकाची माेटरसायकल पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश येथून चाेरून आणल्याचे सांगितल्याने पाेलिसांनी त्याला अटक केली. शिवाय, त्याच्याकडून तीन दुचाकी वाहने जप्त केले. या वाहनांची एकूण किंमत १ लाख १५ हजार रुपये असून, त्याच्याकडून वाहन चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, हवालदार ज्ञानेश्वर राऊत, राजेंद्र रेेवतकर, राेहन डाखाेरे, विपीन गायधने, अमाेल वाघ, अमाेल कुथे, सायबर सेलचे सतीश राठाेड यांच्या पथकाने केली.