शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटच्या दुर्गम भागात धावणार दुचाकी रुग्णवाहिका

By admin | Updated: June 28, 2017 02:49 IST

राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत.

सुमेध वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील बऱ्याचशा दुर्गम भागात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पोहचू शकत नाही. विशेषत: मेळघाटातील अनेक गावे या वैद्यकीय सेवेपासून दूर आहेत. अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत मदत देण्यासाठी दुचाकी रुग्णवाहिका सेवेत आणण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. आॅगस्ट २०१७ पासून प्रायोगिक स्तरावर मेळाघाटात चार दुचाकी रुग्णवाहिकांची मदत घेतली जाणार आहे. विदर्भातील मेळघाट कुपोषणासाठी प्रसिद्ध आहे.या दुर्गम डोंगरी भागात ९० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. रस्ते, वाहतूक व दळणवळणाच्या साधनांचा अभाव आहे. उत्पन्नाची साधने कमी असल्याने गरिबीचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सकस अन्न मिळू शकत नाही. यातूनच माता आणि बालकांचे कुपोषण होते.अस्वच्छता, अशुद्ध पाण्याची समस्या येथे कायम जाणवते. व्यसनाचे प्रमाणही अधिक आहे. परिणामी, आरोग्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यातच दुर्गम भाग असल्याने वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध होत नाही. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका रस्ता सोडून आत येत नाही. या पार्श्वभूमीवर मेळघाटाच्या दुर्गम भागात दुचाकी रुग्णवाहिकेची सेवा घेण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, याची सुरुवात मुंबईच्या झोपडपट्टीतील गल्लीबोळात सुरू करण्याचा २०१५ रोजी निर्णय घेतला होता. परंतु निधीला घेऊन अनेक अडचणी निर्माण झाल्याने ही योजना रखडत गेली. अखेर आॅगस्ट २०१७ पासून या दुचाकी रुग्णवाहिकेला मुंबईत आणि त्याच्या पाठोपाठ मेळघाटात सुरुवात होत आहे.