शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील दोन साहित्यिकांची उमेदवारीत आघाडी

By admin | Updated: September 2, 2015 04:25 IST

ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज

नागपूर : ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातून ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला होता. त्यानंतर मंगळवारी विदर्भ साहित्य संघात त्यांनी दुसरा अर्ज भरला. विदर्भातीलच ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. रवीन्द्र शोभणे यांनी विदर्भ साहित्य संघातून अर्ज भरल्यानंतर मंगळवारी मुंबई मराठी साहित्य संघातून दुसरा अर्ज भरला आहे. यामुळे सध्यातरी विदर्भातले दोन साहित्यिक संमेलनाध्यक्ष पदाच्या शर्यतीत कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी आता होऊन जाऊ द्या, असा नारा दिला आहे. गेली ४० वर्षे घरादाराकडे लक्ष न देता खेड्यापाड्यात कविता वाचनाचे कार्यक्रम केले. कविता घराघरात पोहोचविण्यासाठी परिश्रम घेतले. शेतकरी आणि शेतमजूर यांचे दु:ख सातत्याने कवितेतून मांडले. प्रामुख्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. केवळ पॅकेजने प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांची समस्या सुटली नाही आणि त्यामुळेच संमेलनाध्यक्ष होऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण या शर्यतीत उतरल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पाठिंबा मिळत असून संमेलनाध्यक्ष होण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. विठ्ठल वाघ यांनी आज विदर्भ साहित्य संघात दोन अर्ज भरले. काही कारणाने वा अनावधानाने एखादा अर्ज चुकला तरी उमेदवारी रद्द होऊ नये म्हणून त्यांनी ही खबरदारी घेतली आहे. त्यांचे सूचक डॉ. मनोज तायडे असून अनुमोदक डॉ. बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आहेत. तर दुसऱ्या अर्जात सूचक डॉ. मनोज तायडे असून अनुमोदक डॉ. बबन तायवाडे, बबन नाखले, अतुल लोंढे, कुमार बोबडे आणि डॉ. शरयु तायवाडे आहेत. मुंबईतून डॉ. रवींद्र शोभणे यांनी भरलेल्या अर्जात सूचक अशोक कठाळे तर अनुमोदक डॉ. उषा देशमुख, नीलिमा भावे, दीपक घारे, शुभांगी पांगे, डॉ. पुष्पलता शेट्ये आहेत. मुंबईतून रवींद्र शोभणे यांचा एकमेव अर्ज या शर्यतीत आहे.३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची वेळ असून सायंकाळी ७ वाजता या शर्यतीत कोण उमेदवार आहे, ते स्पष्ट होणार आहे. ३ सप्टेंबरपर्यंत अधिक उमेदवारांचे अर्ज येण्याची शक्यता असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र कसे असेल ते कळेल. (प्रतिनिधी)