शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
4
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
5
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
6
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
7
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
8
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
9
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
10
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
11
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
12
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
13
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
14
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती
15
IT क्षेत्राला मोठा धक्का! इन्फोसिस, TCS, विप्रोचे शेअर्स धडाधड कोसळले; अमेरिकन कंपनीच्या एका निर्णयाचा फटका
16
Gold Silver Price 23 June: इराण-इस्रायल युद्धादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
17
इराणच्या फोर्डोसह तीन ठिकाणांवर अमेरिकेने हल्ले चढविले, पण या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले नाही...
18
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे घाबरला पाकिस्तान; शाहबाज शरीफ यांनी बोलावली तातडीची बैठक, मुनीरही उपस्थित राहणार 
19
एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी
20
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित

वीज कोसळून दोन भावंडं ठार, महिला गंभीर

By admin | Updated: October 16, 2014 00:55 IST

हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभे असलेले भावंड जागीच ठार झाले.

नरसाळा शिवार आणि कळमगाव येथील घटना : बैलजोडीही ठार हिंगणघाट, सेलू (वर्धा)/ चांदूररेल्वे/मंगरूळ चव्हाळा : (अमरावती) : हिंगणघाट तालुक्यातील नरसाळा येथे बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी बाभळीच्या झाडावर वीज पडल्याने झाडाखाली उभे असलेले भावंड जागीच ठार झाले. तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास नरसाळा शिवारात घडली. अण्णा ज्ञानेश्वर रोकडे (३६), विनोद ज्ञानेश्वर रोकडे (३३) अशी मृतकांची नावे असून दुर्गा अण्णा रोकडे (२८) या गंभीर जखमी आहे. त्यांना उपचारार्थ सेवाग्राम येथे हलविण्यात आले.नरसाळा, काचनगाव शिवारात दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या रोकडे कुटुंबीयातील तीन सदस्यांनी बाभळीच्या झाडाखाली आश्रय घेतला होता. मात्र झाडावर वीज पडल्याने दोन जण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास वर्धा व सेलू तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सेलू तालुक्यातील क्षीरसमुद्रपूर आणि बाभुळगाव परिसरातील नाल्याला आलेल्या पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला होता. मतदान प्रक्रिया प्रभावित झाली होती.दुसऱ्या घटनेत चांदूर रेल्वे नजीकच्या कळमगाव येथे वीज कोसळून बैलजोडी ठार झाली. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथे वीज कोसळल्याने मशिदीची भिंत कोसळली. बुधवार दि. १५ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.कळमगाव येथील मारोतराव बागळे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेले २ बैल वीज पडून मृत्युमुखी पडले. बागळे यांनी नुकतीच ६० हजार रुपयांत बैलजोडी विकत घेतली होती. घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मंगरूळ चव्हाळा येथील मशिदीच्या आवारातील कडुनिंबाचे झाड जळाले. मशिद परिसरात लोकवस्ती आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. यवतमाळ जिल्ह्यात पाऊस जिल्ह्यातील राळेगाव, घाटंजी आणि यवतमाळ तालुक्यातील ग्रामीण भागात दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काही काळ मतदान प्रभावित झाले होते. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी राळेगाव आणि घाटंजी तालुक्यात एक ते दीड तास पाऊस कोसळला. तर यवतमाळ तालुक्यातील हिवरी परिसरातही जोरदार पाऊस झाला. (शहर प्रतिनिधी)